Take a fresh look at your lifestyle.

‘किचन कल्लाकार’मध्ये राजकीय खिचडीचा बेत; किशोरी पेडणेकर, चित्रा वाघ, रुपाली ठोंबरे आणणार लज्जत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्याची अत्यंत लोकप्रिय मराठमोळी वाहिनी झी मराठीवरील किचन कल्लाकार या लज्जतदार शोचे प्रचंड फॉलोवर्स आहेत. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी इतकी पसंती दिली आहे कि काही विचारूच नका. कार्यक्रमात येणाऱ्या पाहुण्यांची किचनमध्ये होणारी गडबड पण शेवटी चवीला तोड नाही असा या शो चा फॉरमॅट आहे. या कार्यक्रमात कलाक्षेत्रातील मंडळींसोबत अगदो राजकीय व्यक्तिमत्वदेखील येत असतात. तर आजच्या भागात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, भाजप नेत्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे हजेरी लावणार आहेत. आता एका म्यानात तीन तलवारी आल्यावर जेवण शिजणार का बेत फसणार हे पाहायला मजा येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, भाजप नेत्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे हे तिन्ही राजकारणातील कडाडणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जातात. या तिघीही आपल्या आपल्या बाजूने नेहमीच झुंज देऊन समोर येणारे आव्हान अगदी सोप्प्या पद्धतीने झेलतात. पण यावेळी महाराजांसाठी चविष्ट पदार्थ बनवणं हे आव्हान सोप्प असेल का..? कारण राजकीय धुरा सांभाळणाऱ्या या नेत्या जेव्हा हातात मसाले घेतील तेव्हा कश्या फोडण्या पडतील याचा अंदाज तुम्ही लावूच शकता. त्यामुळे यात कोण बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचे आहे. हा एपिसोड बुधवारी रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

किचन कल्लाकार या शोचे अभिनेता संकर्षण कऱ्हाडे अव्वलरित्या सूत्रसंचालन करतो. पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांचा किचनमध्ये किती हातखंडा आहे याच तो बरोबर मोजमाप ठेवतो. आतापर्यंत अनेक कलाकारांनी या शोमध्ये हजेरी लावली आणि महाराजांच्या भूमिकेत असलेल्या खवय्ये अभिनेता प्रशांत दामले यांच्या जिभेचे चोचले पुरवले आहेत. किचन कल्लाकारमध्ये प्रशांत दामले हे परीक्षकांच्या भूमिकेत आहेत.