Take a fresh look at your lifestyle.

मल्टीस्टारर ‘तख्त’चा टीजर रिलीज, रणवीर सिंग आणि विकी कौशल आमने – सामने

नया माल । बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने करण जोहर दिग्दर्शित बहुप्रतिक्षित फिल्म तख्तचा पहिला टीझर व्हिडिओ शेअर केला आहे. टीजरमध्ये सुवर्ण सिंहासन आणि पार्श्वभूमीवर विकी कौशलसोबत रणवीर सिंगचा व्हॉईस ओव्हर ऐकू येतो. विक्की म्हणतो, “मुघल राजांसाठी सिंहासनाचा रस्ता त्यांच्या स्वतःच्या घरातून गेला.

यानंतर रणवीर सिंगचा आवाज येतो, तो म्हणतो, “जर हा मार्ग प्रेमाच्या माध्यमातून गेला असता … तर मग कदाचित भारताचा इतिहास काही वेगळा असता.” चित्रपटाचा टीझर व्हिडिओ खूप छोटा आहे पण तो खूप शक्तिशाली आहे असे म्हणता येईल.

करण जोहरच्या दिग्दर्शनाखाली बनवलेली ‘तख्त’ या कलाकृतीच्या घोषणेपासून चर्चेत आहे. मोठं बजेट असलेल्या मल्टीस्टारर फिल्ममध्ये रणवीर सिंग, करीना कपूर खान, आलिया भट्ट, विक्की कौशल, भूमि पेडणेकर, जाह्नवी कपूर आणि अनिल कपूर यांच्यासारख्या मोठ्या स्टारकास्टची पर्वणी असणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 24 डिसेंबरला प्रदर्शित होईल.