Take a fresh look at your lifestyle.

इंस्टास्टार किली पॉलवर चाकूने प्राणघातक हल्ला; सोशल मीडियावर दिली माहिती

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडियावर नेहमीच विविध व्हिडिओच्या माध्यमातून नेटकऱ्यांचे मनोरंजन करणाऱ्या पॉल भावंडांना कोण ओळखत नाही. दरम्यान या भावंडांपैकी किली पॉलविषयी एक मोठी बबातमी समोर येत आहे. टांझानियाचा सोशल मीडिया स्टार किली पॉलवर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या हाताला जखम झाल्याचे समोर येत आहे. तसेच या हल्ल्यात त्याच्यावर लाठ्या काठ्यांचाही वापर करून मारहाण केली असल्याचे समोर आले आहे. अज्ञात लोकांनी त्याच्यावर हल्ला केला असून या हल्ल्यात तो सुदैवाने बचावल्याचे किलीने सोशल मीडिया इंस्टाच्या माध्यमातून सांगितले.

किलीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून या हल्ल्याबाबतची माहिती दिली आहे. या हल्ल्यात आपण गंभीर जखमी झाल्याचेही त्याने सांगितले. किली पॉलने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं आहे की, ‘माझ्यावर ५ अज्ञात लोकांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये माझ्या उजव्या हाताच्या बोटाला जखम झाली आहे. शिवाय माझ्या हाताला ५ टाके पडले आहेत. या हल्ल्यादरम्यान मला लाठ्या काठ्यांनीही मारहाण करण्यात आली आहे. पण मी देवाचे आभार मानतो कि, एव्हढा हल्ला होऊनही मी थोडक्यात बचावलो आहे. माझ्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. किलीने शुक्रवारी २९ एप्रिल २०२२ रोजी ही स्टोरी शेअर केली होती.

टांझानियाच्या किली पॉल आणि त्याची बहीण नीमा पॉल हे दोघे भारतीय गाण्यांवर विविध रील्स बनवतात, हे रिल्स सोशल मीडियावर ते शेअर करतात. त्याचे लिपसिंग आणि हुक स्टेप पाहून त्यांचे व्हिडीओज व्हायरल होताना दिसतात. त्यांच्या व्हिडीओ रिल्स ला चांगला प्रतिसाद मिळतो.

अलीकडेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पॉल भावंडांचे कौतुक केले आहे. दरम्यान या दोघांनाही भारतीय संगीताची आवड, क्रेझ आहे आणि त्यांच्या व्हीडिओला चांगली लोकप्रियता मिळतेय, असं पंतप्रधान म्हणाले होते. पंतप्रधानांच्या स्तुतीनंतर या दोघांची लोकप्रियता झपाट्याने वाढली आहे.