Take a fresh look at your lifestyle.

हेमांगीला लागलाय म्हावऱ्याचा नाद! सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेत्री हेमांगी कवी हि सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. यामुळे अनेकदा ती आपल्या चाहत्यांसोबत विविध फोटो, विविध व्हिडीओ, अनुभव आणि आगामी प्रोजेक्ट्सची माहिती देताना दिसते. याहीवेळी तिने एक अशीच पोस्ट शेअर केली आहे. जी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. या पोस्टमध्ये ती शाकाहारी असता असता मांसाहारी कशी झाली ते सांगतेय. तिची हि पोस्ट पाहून अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. हेमांगीचा सेन्स ऑफ ह्युमर कौतुक करण्याजोगा आहे.

हेमांगीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवरून हि पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने एक फोटो आणि त्यासह एक भन्नाट कॅप्शन लिहिलं आहे. या कॅप्शनमध्ये लिहिताना हेमांगीने म्हटलंय कि, ‘ही पोळी साजूक तुपातली हिला म्हावऱ्याचा लागलाय नाद! लग्नाच्या आधी मी फार कमी, कमी म्हणजे नाहीतच जमा, मांसाहार करायचे, मधली ६ वर्ष तर मी अंड सुद्धा खाल्लं नव्हतं. इतकी vegetarian होते. पण मग पुढे लग्न झालं कोकणातल्या माणसासोबत आणि मग काय हळू हळू मांसाहार वाढत गेला. तेव्हा वरील ओळी चपखल आपल्यासाठीच लिहिल्या आहेत असं वाटतं! असं vegetarian to non- vegetarian कोण कोण झालंय सांगा पाहू? बरं ते जाऊदे… आज कालवणास काय केलंय ते सांगा!”, असे तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे. हेमांगीच्या या पोस्टवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. यातील अनेकांनी आपल्या खाण्याच्या आवडीबद्दल सांगायला जराही संकोच केला नाही. तर अनेकांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

या कॅप्शनसोबत शेअर केलेल्या फोटोत हेमांगीने या फोटोमध्ये ती एका खास वेशभूषेत दिसत आहे. ‘कोळी’ संस्कृतीत नेसली जाणारी साडी यावेळी तिने परिधान केली असल्याचे दिसत आहे. या निळ्याशार साडीत हेमांगीचे रूप खुलून दिसत आहे. एका डान्स साठी तिने ही वेशभूषा केली होती. पण हा फोटो पोस्ट करताना तिने आपल्या लग्नाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तिच्या सौंदर्याचे कौतुक करताना एका चाहतीने लिहिले आहे कि, कधी कधी वाटतं तुझ्या सौंदर्याच्या व्याख्या कराव्या… पण साच्यात हे रुप धजतच नाही…. आणि कागद कोराच राहून जातो… खरचं गोड आहेस रुपांनी आणि मनानी ही…!! तर आणखी एकाने नाद करायचा नाय अशी कमेंट केली आहे.