Take a fresh look at your lifestyle.

ग्रेट भेट विथ आशुतोष गोवारीकर; राणा दाची इंस्टा पोस्ट चर्चेत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कलाकार मंडळी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. त्यांच्याशी संवाद साधतात. त्यांच्या आपल्या आगामी प्रोजेक्ट आणि नव्या भूमिकांविषयी गप्पा मारतात. या माध्यमातून ते सहजोगत्या प्रेक्षकांच्या त्याच्या बाबतीतल्या प्रतिक्रिया जाणून घेत असतात. अभिनेता हार्दिक जोशीदेखील त्यांपैकीच एक. तो कायमच आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाद्वारे संपर्कात असतो. स्वतः संबंधित अनेक प्रकारची माहिती तो शेअर करत असतो. नुकताच त्याने एका खास व्यक्तीसोबतचा शेअर केलेला फोटो अनेक चर्चा उठवीत आहे. राणा दा चित्रपटात दिसणार का काय? असा प्रश्न हा फोटो पाहिल्यावर पडतोय.

या फोटोत हार्दिक जोशी बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्यासोबत दिसत आहे. आशुतोष गोवारीकर यांच्यासोबतचा हार्दिकच्या फोटोमुळे त्याचे चाहते सोडा इतरही सारेच अनेक तर्कवितर्क लावताना दिसत आहेत. आता हार्दिक जोशी बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकणार अशा आशयाच्या चर्चाना सोशल मीडियावर चांगलेच उधाण आले आहे. हार्दिक आणि आशुतोष यांच्या भेटीमागे नेमके काय कारण आहे हे अद्याप तरी समोर आलेले नाही. तरीही येत्या काळात हार्दिक जर बॉलिवूड चित्रपटांत दिसला तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको, काय..?

झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. मालिकेतल्या प्रत्येक कलाकारांचा अंदाज रसिकांच्या पसंतीस उतरला होता. विशेष म्हणजे राणा दा आणि अंजली बाईंची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली होती.

पाठकबाई साकारलेली अक्षया देवधर आणि राणा दा भूमिका साकारणारा हार्दिक जोशीने यांनी आपल्या अभिनयाने रसिकांची विशेष पसंती मिळवली. या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांनाही “कोल्हापूरची संस्कृती, रांगडी भाषा, कुस्ती परंपरा, शेतकरी वारसा अगदी जवळून जाणून घेता आला. मालिका संपली तरीही अजून तिची जादू मात्र कायम आहे.