Take a fresh look at your lifestyle.

जेव्हा तुम्ही लाटेच्या विरुद्ध दिशेने पोहता…; अभिनेत्री क्रांती रेडकरचा पती समीर वानखेडेंना खंबीर पाठिंबा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मुंबई-गोवा क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणात एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने पार्टीत उपस्थित असलेल्या काही जणांना अटक केली. यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानददेखील सामील होता. यामुळे साहजिकच त्याला अटक झाली. या अटकेनंतर बॉलिवूडमध्ये वादळ आलं तर राजकारणातील अनेको वर्तुळ बदलल्याचे पाहायला मिळाले. यानंतर विभागीय संचालक समीर वानखेडे व त्यांची पत्नी क्रांती रेडकर तसेच बहीण जास्मिन वानखेडे यांच्यावर अनेको आरोप लावण्यात आले. इतकेच नव्हे तर आता समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणावरून आता समीर वानखेडे यांची पत्नी मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकर चांगलीच संतापली आहे आणि तिने हा संताप एका ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. तसेच या ट्विटमध्ये तिने “सत्यमेव जयते,” असे नमूद केले आहे.

अभिनेत्री क्रांती रेडकर हिने पती समीर वानखेडे यांना खंबीर समर्थन देत एका ट्विटमध्ये आपला संताप व्यक्त केला आहे. हे ट्विट सकाळी ८ वाजून ५१ मिनिटांनी केलेले आहे. क्रांती रेडकरने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे कि, “जेव्हा तुम्ही लाटेच्या विरुद्ध दिशेने पोहता, तेव्हा तुम्ही बुडू शकता. पण जर तुम्ही सर्वात शक्तिशाली असाल तर मात्र जगातील कोणतीही लाट तुम्हाला बुडवू शकत नाही. कारण सत्य हे फक्त त्याला माहिती आहे. शुभ सकाळ, सत्यमेव जयते,”. निश्चितच या ट्विटच्या माध्यमातून क्रांतीने प्रत्येक टीकाकरावर निशाणा साधला आहे.

सूत्रानुसार, आर्यन खान अटक प्रकरणात तब्बल २५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असून त्यातील ८ कोटी रुपये ‘एनसीबी’चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते, असा गंभीर आरोप ‘एनसीबी’चे पंच प्रभाकर साईल यांनी केला आहे. त्यानंतर समीर वानखेडे याना दिल्ली येथील एनसीबीच्या मुख्य कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. या प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यामुळे तो अद्यापही तुरुंगाचा पाहुणचार घेत आहे. परंतु दुसरीकडे त्याचे पिता शाहरुख खान व आई गौरी खान यांची चिंता दिवसागणिक वाढत असल्याचे दिसून येत आहे.