Take a fresh look at your lifestyle.

शिल्पा शेट्टी का फिगर खराब हुआ क्या? क्रितीच्या ‘मिमी’चा ट्रेलर झाला रिलीज; पहा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सॅनन गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. याचे मुख्य कारण असे कि, कृतीचा आगामी चित्रपट मिमी आणि मिमीमधील तिचा लूक. या चित्रपटातील तिचा बेबी फ्लॉन्ट करतानाच फोटो पहाऊन अनेको चर्चा उठल्या होत्या. मध्यंतरी कुठेतरी पुसटशी झालेली करिती अचानक प्रकाशझोतात आली आहे. या चित्रपटाच्या पोस्टरनंतर आता या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून तो कृतीने अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या ट्रेलरला अगदी काहीच तासांत प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. शिवाय चित्रपटाचे कथानक अत्यंत भावणारे थोड्या हलक्या कॉमेडीसोबत मोठा विषय मांडणारे आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकतादेखील चांगलीच शिगेला पोहोचली आहे.

या ट्रेलरमध्ये चित्रपटाची एक झलक दिसते आहे. यात एका सरोगसी आईची कहाणी दाखवली आहे. जी भूमिका अभिनेत्री क्रिती सॅनन उत्तमरीत्या बजावताना दिसत आहे. एका अमेरिकन जोडप्याला बाळाची इच्छा असते आणि ते बाळ क्रितीच्या गर्भात वाढवण्यासाठी ते तिला विनंती करतात. इतकेच नव्हे तर त्यांचे बाळ पोटात वाढवणाऱ्या महिलेला ते २० लाख रुपये देणार असल्याचेही सांगतात. यावर ती लगेच तयार होते. पण नंतर त्यांना हे बाळ नको होते. त्यामुळे ते जोडपे तिला गर्भपात करण्यास सांगतात. या दरम्यान सरोगसी आईची होणारी मानसिक आणि शारीरिक अवहेलना या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

या चित्रपटाचा हा दमदार ट्रेलर प्रदर्शित होऊन अगदी काहीच तास झाले आहेत. तोच प्रेक्षकांनी हा ट्रेलर उचलून घेतला आहे आणि या ट्रेलरला भरभरून प्रतिसाद दिला आहे. हा संपूर्ण चित्रपट पाहण्यास प्रेक्षक खरोखरीच खूप उत्सुक आहेत. शिवाय या चित्रपटात क्रितीसोबत सुप्रिया पाठक, पंकज त्रिपाठी, सई ताम्हणकर, मनोज पाहवा हे देखील अत्यंत महत्वाच्या मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

या चित्रपटाचे शूटिंग गतवर्षीच पूर्ण झाले आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्मात्यांनी चित्रपटाचे प्रदर्शन रोखले होते. मुख्य बाब अशी कि, हा चित्रपट महिला केंद्रित असणार आहे. कारण, यामध्ये सरोगेट आईची कहाणी दाखवली जाणार आहे. दिनेश विजान हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर हा चित्रपट ३० जुलैला ओटीटी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. आता प्रतिक्षा फक्त प्रदर्शनाची.