Take a fresh look at your lifestyle.

कुंद्राचे ‘राज’ लवकरच उलगडणार; लॅपटॉपमध्ये सापडल्या अश्लील क्लिप

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्या लॅपटॉपमध्ये असलेले पॉर्न क्लिप्सचे ‘राज’ आता लवकरच उलगडणार आहे. कारण राज कुंद्राच्या अटकेनंतर गुन्हे शाखेकडून त्याचा लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. ज्यात ‘सॅम बॉक्स’ नावाचा एक फोल्डर आहे ज्यात ४८ जीबी डाटा आहे. पोलिस राजच्या सॅम बॉक्सला डिकोड करण्याचे सध्या प्रयत्न करीत आहेत. या ‘सॅम बॉक्स’चे कोडे उलगडण्यात गुन्हे शाखेला यश आले तर निश्चितच या रॅकेटमध्ये बड्या बड्या लोकांची नाव समाविष्ट असतील, असा अंदाज आहे.

या लॅपटॉपमधून बॉलिवूडमधील अश्लीलतेचा खुलासा होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. या लॅपटॉपमध्ये ‘हॉटशॉट अॅप’चे तब्बल ५१ व्हीडिओ आढळून आले आहेत. तथापि, त्यातून पॉर्न चित्रपटांचा टेडा डिलीट करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा मुंबई या पथकाने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्या मुंबईतील जुहूस्थित निवासस्थानावर छापा मारत घराची झडती घेतली. या कारवाईनंतर मुंबई पोलिस कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांना समोरा-समोर बसवून चौकशी करणार असल्याचे सांगितले जात आहे. तपासात हॉट शॉटचे २० लाख सबस्क्रायबर असल्याचेही समोर आले आहे.

राज कुंद्राला २७ जुलै २०२१ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालायाने शुक्रवारी दिले. या कारवाईत राजचा साथीदार रायन थॉर्पेलाही पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. राज आणि रायन थॉर्पेला शुक्रवारी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांनी राज आणि रायनची चौकशी करायची असल्याचे सांगत दोघांची पोलिस कोठडी वाढवावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली. त्यामुळे न्यायालयाने दोघांचीही २७ जुलै २०२१पर्यंत पोलीस कोठडी वाढवण्याचे आदेश दिले असून त्यांची रवानगी पुन्हा एकदा भायखळा कारागृहात केली आहे. इतकेच काय तर, राजने पॉर्नोग्राफीतून कमावलेला पैसा ऑनलाईन सट्टेबाजीत गुंतविल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे त्याच्या येस बँक आणि युनायटेड बँक ऑफ आफ्रिका या खात्यांतून झालेल्या व्यवहारांची चौकशी पोलिस करणार आहेत.