Take a fresh look at your lifestyle.

‘ती परत आलीये’ मालिकेत मुख्य भूमिका साकारणार कुंजीका काळवींट; भूमिकेविषयी म्हणाली..

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी म्हणून ओळखली जाणारी झी मराठी वाहिनी सध्या अनेक नव्या मालिकांचा क्रम घेऊन येत आहे. दरम्यान, येत्या १६ ऑगस्ट २०२१ पासून ‘देवमाणूस’ मालिकेच्या जागी रात्री १०.३० वाजता ‘ती परत आलीये’ हि गुढमय मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. साधा या मालिकेच्या प्रोमोने सगळीकडे चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मालिकेच्या प्रोमोतील भयावह स्वरूप पाहून हि मालिका भयमालिका असणार यात काही वादच नाही. त्यामुळे या मालिकेची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या मालिकेत विजय कदम बऱ्याच दिवसांनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत हे प्रोमोतून समजले मात्र यानंतर आता आणखी एक आहे. ते म्हणजे अभिनेत्री कुंजीका काळवींट हिचे नाव नुकतेच समोर येत आहे.

दरम्यान या मालिकेतील भूमकेविषयी माध्यमांशी बोलताना कुंजिका म्हणते कि, यापूर्वी मी मालिकेत खलनायकी भूमिका साकारली होती. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात मला तशाच प्रकारच्या भूमिकांसाठी विचारण्यात येत होतं. पण एक कलाकार म्हणून मला नव्या भूमिकांची आस होती आणि ही संधी ‘ती परत आलीये’ या मालिकेच्या निमित्तानं मला मिळाली. मला स्वतःला थ्रिलर हा प्रकार अधिक आवडतो. त्यामुळे अशा मालिकेत एक वेगळ्या धाटणीची भूमिका साकारण्यासाठी मी उत्सुक आहे. ही भूमिका आव्हानात्मकदेखील आहे. शिवाय या मालिकेमुळे मला ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळतेय, याचा मला आनंद आहे.

‘एक निर्णय’ या चित्रपटातून कुंजीकाने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. यानंतर कुंजीकाने ‘स्वामीनी’ मालिकेत आनंदीबाईची भूमिका साकारली होती. ही भूमिका नकारात्मक असल्याने कुंजीकाला प्रेक्षकांचा रोष पत्करावा लागला होता. यानंतर ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत तिने प्रियाची भूमिकादेखील साकारली होती. यानंतर आता ‘ती परत आलीये’ मालिकेत ती प्रमुख भूमिका बजावणार आहे. तसेच तिच्यासोबत अभिनेता श्रेयस राजे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. श्रेयसने फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत राजकुमारची भूमिका साकारली होती. शिवाय ‘भेटी लागी जिवा’ आणि ‘जिगरबाज’ या मालिकांमध्येही त्याने काम केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.