Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘राजकारण नको वाटतं, बातम्या ऐकून डोकं फाटतं’; कुशलच्या हटके रॅप सॉन्गची हवा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 14, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Kushal Badrike
0
SHARES
6
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रेक्षकांचा लाडका कॉमिक अभिनेता कुशल बद्रिके हा चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून सगळ्यांना हसवताना आपण पाहिला आहे. याशिवाय विविध चित्रपटातील लहान मोठ्या भूमिकांमध्ये आपण कुशलला पाहिले आहे. पण कुणी कुशलला गाताना ऐकलंय का..? नाही..? मग आता त्याला गातानाही ऐकता येईल. कारण विजू माने लिखित एका गाण्याचे गायन स्वतः कुशलने केले आहे. हे गाणं रॅप सॉन्ग असून सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं आहे. याबाबत विजू माने यांनी पोस्ट शेअर केली आहे.

विजू माने यांनी फेसबुकवर हि पोस्ट शेअर केली आहे. हि एक व्हिडीओ पोस्ट असून यासोबत त्यांनी एक कॅप्शन लिहिले आहे. त्यांनी लिहिलंय कि, टायटल सॉंग लिहायला मला आवडतं. याआधीही मी काही मालिकांची, सिनेमांची टायटल सॉंग लिहिली आहेत. राजकीय गाणी लिहिणं हा माझ्या व्यवसायाचा भाग आहे. पण हे टायटल सॉंग माझं मलाच आवडलं. कुशलने गातानाही मन लावून गायल्यामुळे त्याची रंगत वाढलीये. माझ्या मते कुशलचा गायक म्हणून हा पहिला प्रयत्न असावा. तुम्हाला आवडतंय का पहा. आणि हो लक्षात आहे ना 15 तारखेला पहिला एपिसोड येतोय light & shade events आणि salaamthane या फेसबुक आणि यूट्यूब चैनल वर.

View this post on Instagram

A post shared by Light And Shade Events (@lightandshadeevents)

‘जीवाचं रान मतदान’ नामक एका टॉक शो चे हे टायटल सॉंग असून याचे सूत्र संचालन स्वतः विजू माने करणार आहेत. या गाण्याचे बोल स्वतः दिग्दर्शक विजू माने यांनी लिहिले आहेत. कुशल बद्रिकेने गायक म्हणून पहिल्यांदाच गाणे गायले आहे. या गाण्याचे बोल अतिशय हटके आहेत. राजकारण नको वाटतं, बातम्या ऐकून डोकं फाटतं असे काहीसे याचे बोल आहेत. या गाण्याला सोशल मीडियावर तुफान पसंती मिळत आहे. प्रेक्षकांनीही कुशलला गायक म्हणून मान्य केले आहे आणि त्याचे गाणे डोक्यावर उचलून घेतले आहे.

Tags: Instagram Postkushal badrikeTalk ShowViju ManeViral Song
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group