Take a fresh look at your lifestyle.

सोनी मराठीच्या नव्या मालिकेत ‘लागीर..’ची शीतली झळकणार; पहा प्रोमो

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावर मात्र अत्यंत लोकप्रिय असणाऱ्या झी मराठी वाहिनीवरील प्रचंड गाजलेली मालिका ‘लागीरं झालं जी’ मधून प्रेक्षकांच्या घराघरात आणि मनामनांत पोहोचलेली शीतली पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहे. शीतली अर्थात मराठमोळी अभिनेत्री शिवानी बावकर पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांच्या भेटीला येत आहे. शिवानीने शीतली होऊन प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची अशी छाप पाडली कि तिला विसरणे चाहत्यांसाठीदेखील अशक्य झाले आहे. त्यानंतर आता शिवानी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सोनी मराठी वाहिनीवरील नव्या मालिकेत झळकणार आहे. या मालिकेचा नुकताच पहिला प्रोमो रिलीज झाला आहे.

सोनी मराठी वाहिनी लवकरच नवी कोरी मालिका ‘कुसुम’ घेऊन येत आहे. यामध्ये अभिनेत्री शिवानी बावकर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. नुकताच या मालिकेचा पहिला प्रोमो वाहिनीतर्फे प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘कुसुम’ मालिकेत एका सर्वसामान्य मुलीची कथा दाखवण्यात येणार आहे. जी आपलं सासर आणि माहेर अशी दोन्हीकडची जबाबदारी पेलणार आहे. मुलीचं लग्न झालं म्हणजे तिचं सासर हेच तिचं घर, अशी मानसिकता समाजात पहायला मिळते. लग्न झाल्यावर माहेरची जबाबदारी मुलींची नसते, असं परंपरागत मानलं जातं. मात्र, कुसुम या सर्व मान्यतांना मोडीत काढते आणि सासरसोबत आपल्या आईवडिलांची जबाबदारी घेते.

https://www.instagram.com/reel/COcUke3HgUe/?utm_source=ig_web_copy_link

आपलं लग्न झाल्यावर भावावर आई- वडिलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी देऊन मोकळं का व्हायचं, असा प्रश्न हि कुसुम संपूर्ण समाजासमोर उपस्थित करत आहे. या मालिकेचा हा प्रेरणादायी प्रोमो पाहून शिवानीचे सर्व चाहते खुश झाले आहेत. इतकेच काय तर मालिकेची आतुरतेने वाट पाहू लागले आहेत. एक नवी संकल्पना आणि एक नवा दृष्टिकोन घेऊन शिवानी लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘कुसुम’ ही मालिका सोनी हिंदी वाहिनीवरील मालिका ‘कुसुम’चा रिमेक आहे. लोकप्रिय दिग्दर्शक- निर्माती एकता कपूर या मालिकेची निर्मिती करत आहे. या नव्या भूमिकेतून शिवानी पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकणार असा विश्वास तिच्या चाहत्यांकडून व्यक्त केला जात आहे.