Take a fresh look at your lifestyle.

‘लागीरं झालं जी’ फेम अभिनेत्याचे कार अपघातात निधन; पुण्यातील रोटी घाटात ओढवला काळ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील ‘लागीरं झालं जी’ हि मालिका संपली असली तरीही तीच क्रेझ अद्याप कायम आहे. त्यामुळे मालिकेतील प्रत्येक कलाकार आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. सध्या या मालिकेशी संबंधित एका कलाकाराविषयी दुःखद बातमी समोर येत आहे.

lagir fame dnyanesh mane

या मालिकेतून लोकप्रिय झालेल्या अभिनेते ज्ञानेश माने यांचा कार अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक आणि तितकीच दुःखद बातमी समोर येत आहे. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांवर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील रोटी घाटातून प्रवास करताना ज्ञानेश माने यांच्या चारचाकी गाडीला भीषण अपघात झाला होता. घाटातील वळणावर झालेल्या या भीषण अपघातानंतर ज्ञानेश माने बेशुद्ध झाले होते. ज्ञानेश बेशुद्धावस्थेत पडून असल्याचं काही जणांनी पाहिलं आणि या स्थानिकांनी त्यांना तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले. पण दुर्दैव म्हणावे लागेल कि, रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच ज्ञानेश यांनी प्राण सोडले होते. ज्ञानेश यांच्या निधनाने संपूर्ण माने कुटुंबावर शोककळा पसरली असून ऐन उमेदीच्या काळात त्यांचे निधन झाल्यामुळे सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

दिवंगत अभिनेते ज्ञानेश माने हे मूळ पुणे जिल्ह्यातील बारामती, जरडगावचे रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे. ज्ञानेश माने हे पेशाने डॉक्टर होते. मात्र त्यांना अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांनी अभिनय क्षेत्रात नशीब आजमावलं आणि ते लोकप्रिय झाले. लागिरं झालं जी या मालिकेत ज्ञानेश माने यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. याशिवाय सोलापूर गँगवार, काळूबाईच्या नावानं चांगभलं, अंबुज, हंबरडा, यादया यांसारख्या अनेक चित्रपटांत त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या.