हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील बहुचर्चित मालिका लागिरं झालं जी मधून घराघरांत पोहोचलेली शीतली म्हणजेच शिवानी बावकर हिला कोरोनाची लागण झाली आहे. यांबाबतची माहिती तिने स्वतःच दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत तिने आपल्या चाहत्यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची बातमी दिली आहे. सोबतच सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.
तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे कि,’ सर्व काळजी आणि खबरदारी घेऊनही, दुर्दैवाने माझी कोविड १९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे पालन करत, मी माझ्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार औषधोपचार करीत आहे. मी सर्वांना विनंती करते की कृपया अतिरिक्त खबरदारी घ्या आणि आवश्यक असल्यासच बाहेर पडा. सुरक्षित राहा आणि निरोगी राहा. भेटू लवकरच! खूप प्रेम शिवानी बावकर. हि पोस्ट पाहताच तिच्या चाहत्यांनी लवकर बरी हो, गेट वेल सून अश्या कमेंट्स केल्या आहेत. तर अनेक मराठी कलाकारांनी देखील काळजी घे. लवकर बरी हो. अश्या कमेंट्स तिच्या पोस्टवर केलेल्या आहेत.
शिवानी बावकर ही मराठी अभिनेत्री आहे. तिने लागिरं झालं जी या मालिकेतून प्रेक्षकांना अगदी वेड लावलं. याआधीही तिने फुलवा, नव्या आणि अनामिक अश्या हिंदी मालिकांमध्ये सहकलाकार म्हणून काम केले आहे. पुढे अल्टी पल्टी सुमडीत कल्टी, मनमंदिरा गजर भक्तीचा, चला हवा येऊ द्या ह्या मराठी कार्यक्रमांमध्ये देखील तिने काम केले आहे. इतकेच नव्हे तर युथट्यूब, दगडाबाईची चाळ, उंडगा या चित्रपटांत देखील ती दिसली होती. शिवानीला दगडाबाईची चाळ या चित्रपटासाठी सिल्व्हर स्क्रीन ॲवॉर्ड् तर लागिरं झालं जी या मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे