Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्राला मिळाली महामिनिस्टर; रत्नागिरीच्या वहिनींनी पटकावली 11 लाखाची रत्नजडित पैठणी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात विविध भागात आदेश भावोजी महाराष्ट्राच्या ‘महामिनिस्टर’च्या शोधात फिरताना दिसत होते. या पर्वाची विशेष बाब म्हणजे या पर्वाच्या सुरुवातीपासूनच ११ लाखांची पैठणी जोरदार चर्चेत होती. होय होय ११ लाखांची पैठणी. सोन्याची जर आणि रत्नजडित ११ लाखांची हि पैठणी कोण जिंकणार या कडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होत. कारण राज्यातील विविध भागातून अनेक वहिनी या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. अखेर महाराष्ट्राला महामिनिस्टर सापडली. चुरशीची लढत देऊन रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे यांनी हि पैठणी जिंकली आहे. त्यामुळे सर्व स्तरांवरून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

रत्नजडित ११ लाखांची पैठणी जिंकण्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या १० शहरांमधून अनेक वहिनी तगडी टक्कर देत आमने सामने उतरल्या होत्या. त्यामध्ये औरंगाबादच्या शरयू पाटील, पनवेलच्या सोनाली पाटील, ठाण्याच्या सुवर्ण पेंढारे, अहमदनगरच्या अपेक्षा पवार, नाशिकच्या डॉ. रुपाली पाखरे, रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे, पुण्याच्या कावेरी मत्रे, कोल्हापूरच्या सलोनी येवलेकर, सोलापूरच्या सपना रंगदाळ, नागपूरच्या निवेदिता गुरुभेले या वहिनींनी आधी त्यांच शहर गाजवलं होत. त्यांनी आपापल्या शहरामध्ये १.२५ लाखाच्या पैठणीचा मान मिळवला आणि त्यानंतर टॉप १० वहिनी म्हणून ११ लाखाच्या पैठणीसाठी आमने सामने आल्याचे दिसल्या.

या १० वहिनींमध्ये ११ लाखांच्या पैठणीसाठी इतका जबरदस्त सामना रंगला कि बस्स. पण अखेरीस विजय एकीचाच होणार होता आणि तो झाला. विजेत्या वहिनीच्या हाती महापैठणी देऊन या पर्वाचा शेवट करण्यात आला. शेवटच्या फेरीत ही महापैठणी रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे यांनी पटकावली आणि रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. यांनतर आता २७ जून २०२२ पासून म्हणजेच आजपासून होम मिनिस्टरचं नवं पर्व ‘खेळ सख्यांचा चारचौघींचा’ हे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.