हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळात बॉलिवूड सिनेसृष्टीवर प्रेक्षकांची नाराजी फारच दिसून आली होती. ज्यामुळे बॉलीवूडला वाईट काळाचा सामना करावा लागला. या दरम्यान बॉयकॉट बॉलिवूड हा ट्रेंड जोरात चालला. दरम्यान आमिर खान आणि करीना कपूर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट चांगलाच तोंडावर आपटला. या चित्रपटाने अतिशय शुल्लक कामे करूनच गाजागोजा गुंडाळला. यामुळे निर्मात्यांना मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले. प्रेक्षकांनी या चित्रपटावर बहिष्कार टाकल्यामुळे आता पुढे काय..? असा प्रश्न निर्माण झाला होता. यानंतर नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. का..? कधी..? कसे..? यापेक्षा रिलीज झाला हे महत्वाचे आहे.
प्रेक्षकांनी आमिर खानच्या लाल सिंग चढ्ढाला मोठ्या प्रमाणात झिडकारल्यामुळे आमिरला आणि चित्रपट निर्मात्यांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले होते. पहिल्यांदाच आमिर एवढा निराश झाला होता कि त्याने काही काळासाठी मीडियापासूनही दूर राहण्याचे योजिले. वास्तविक नेटकऱ्यांची, चाहत्यांची अनेकदा माफी मागून देखील हा चित्रपट आपटला.
लाल सिंग चढ्ढाच्या कमाईच्या आकडयांविषयी तर न सांगणेच योग्य राहील. यावेळी आमिरला अनेकांनी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करणार का..? असा सवाल केला होता. दरम्यान आपण किमान ६- ७ महिन्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार करत असल्याचे त्याने सांगितले होते. मात्र आता अचानक नेटफ्लिक्सवर एअर होणार लाल सिंग चड्ढा पाहून त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का असला आहे.
मुख्य सांगायचे म्हणजे, कोणत्याही प्रमोशन, मार्केटिंग, गाजावाजाशिवाय आमिरने आपला ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट लोकप्रिय ओटीटीवर प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केला आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. यानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीतच तो नेटफ्लिक्सच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. याचे आश्चर्य सगळ्यांनाच आहे. पण आता महत्वाचे हे आहे कि, प्रेक्षक ओटीटीवर या चित्रपटाला प्रतिसाद देतात कि इथेही आमिरच्या पदरी अपयशच पडणार..?
Discussion about this post