Take a fresh look at your lifestyle.

लूकिंग HOT! सुष्मिताच्या स्विमिंग व्हिडीओवर ललित मोदींची कमेंट; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन गेल्या काही काळात तिच्या नव्या नव्या रिलेशनशिपमूळे प्रचंड चर्चेत आल्याचे दिसली. आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी सुष्मितासोबत आपले नाते आहे हे सांगताना काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यानंतर जो बवाल झाला तो आपण पाहिलाच. यानंतर अजूनही प्रेक्षक ‘ये रिश्ता क्या केहलाता है’ याच भूमिकेवर आहेत. त्यातच आता सुष्मिता सेनने सोशल मीडियावर आपला स्विमिंग करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतोय. पण त्यापेक्षा कहर म्हणजे ललित मोदींची कमेंट आणि त्यावरील ट्रोलिंग.

अभिनेत्री सुष्मिता सेन हि सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. यामुळे ती अनेकदा आपल्या चाहत्यांसाठी व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना दिसते. अगदी तसंच याहीवेळी तिने समुद्रात स्विमिंग करतानाच हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये सुष्मिताचा लूक जबरदस्त दिसतो आहे यात काही शंकाच नाही. सुष्मिताने तिच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करताना एक कॅप्शनही लिहिले आहे. तिने लिहिलंय कि, ‘सरळ व्हा, एक श्वास घ्या आणि गोष्टी जाऊ द्या. आत्मसमर्पण करा आणि त्यातून शिका’. या व्हिडिओमध्ये सुष्मिता समुद्रात डुबकी मारताना दिसते. यावर ललित मोदींनी ‘लुकिंग हॉट इन सार्डिनिया’ अशी कमेंट केली आहे आणि एव्हढंच ट्रोलिंगला कारण मिळालं आहे.

या व्हिडिओमध्ये, सुष्मिता एका जहाजावर दिसते आहे. पोहण्यासाठी तिने तोंडाला ब्रीदिंग मास्क लावलाय आणि तिने काळ्या स्पॅगेटी टॉपसह पांढरा स्कर्ट परिधान केला आहे. त्यामुळे तिचा हा लूक खरंच भारी दिसतो आहे. म्हणून साहजिकच तिच्या सौंदर्याची तारीफ करण्यापासून कुणी स्वतःला थांबवू शकत नाही.

 

पण ललित मोदी आणि तिच्या नात्यावर इतकं वावटळ उठत असताना त्यांनी यावर कमेंट करणे ट्रोलर्सच्या पथ्थ्यावर पडलं. ट्रोलर्सने अक्षरशः ललित मोदींना पिळून काढलं आहे. कुणी अर्वाच्य तर कुणी चाटाळ प्रतिक्रिया देत मोदींवर ट्रोलिंगची बरसात केली आहे.