Take a fresh look at your lifestyle.

लता दीदींचे शेवटचे क्षण! अश्रू, हुंदके आणि भरलेल्या उरातून शोकसंवेदनांचा पाझर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज सकाळी निधन झाले. हि बातमी अगदी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आणि जगभरातून अक्षरशः टाहो फुटला. गेल्या २९ दिवसांपासून लता दीदींवर मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात उपचार सुरु होते. कोरोनामुक्त झाल्यानंतरही लता दीदींची न्यूमोनियाशी झुंज सुरूच होती. अखेर हि झुंज अपयशी झाली आणि लता दीदींना देवाज्ञा झाली. सध्या मुंबईतील शिवाजी पार्क येथे लता दीदींचे पार्थिव त्यांच्या चाहत्यांना अंतिम दर्शन घेता यावे म्हणून ठेवण्यात आले आहे. दरम्यान त्यांचे चाहते साश्रू नयनांनी दीदींचे अंतिम दर्शन घेत आहेत. एकंदरच संपूर्ण वातावरण अत्यंत भावुक आहे

 

View this post on Instagram

 

A post shared by ETimes (@etimes)

लता दीदी यांच्यी विशेष बाब म्हणजे, वयाच्या तेराव्या वर्षी वडील दीनानाथ मंगेशकर यांचे निधन झाले. अशावेळी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेताना त्यांनी स्वतःच्या आयुष्याचा विचार कधीच केला नाही. लता दीदींचे वय फारसे नव्हते पण खांद्यांमध्ये कुटुंबाची जबाबदारी पेलता येईल इतके बळ सामावलेले होते. लता दीदींनि आपल्या चारही भावंडांचा व्यवस्थित सांभाळ केला. कुटुंबासाठी त्यांनी लग्नदेखील केले नाही. त्यांनी नेहमीच आपल्या कुटुंबाची पाठराखण केली. इतकेच नव्हे तर लता दीदींचे स्वर जितके मधुर तितकीच मधुर त्यांची वाणी होती. लता दीदींचे प्रत्येकाशी जिव्हाळ्याचे संबंध होई. त्यामुळे आज लता दीदींचे हयात नसणे हि बाब सर्वांच्याच जिव्हारी लागली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

ब्रीच कॅंडी रुग्णालयातून लता दीदींचे पार्थिव सर्वप्रथम त्यांच्या निवासस्थानी प्रभुकुंज येथे नेण्यात आले होते. यानंतर लता दीदींच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे, सचिन तेंडुलकर, जावेद अख्तर, अनुपम खेर, सुभाष देसाई, बाळा नांदगावकर, आदित्य ठाकरे, अनिल देसाईन सायरा बानो, अमिताभ बच्चन, अजय गोगावले यांसारखे दिग्गज कलाकार, तसेच नेते मंडळी उपस्थित होते. यानंतर लता दीदींचे पार्थिव शिवाजी पार्क येथे चाहत्यांसाठी अंत्य दर्शन घेण्यासाठी ठेवण्यात आले आहे. अगदी काहीच वेळात लता दीदींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्य संस्कार पार पडतील आणि दीदी अनंतात विलीन होण्याच्या प्रवासास निघतील.