Take a fresh look at your lifestyle.

लता दीदींची गाणी म्हणजे स्वर्गीय सुरांची मैफल; ऐका आणि मंत्रमुग्ध व्हा!

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन हि बातमी ऐकताच जगभरातून अक्षरशः टाहो फुटला. गेल्या २९ दिवसांपासून लता दीदींवर मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात उपचार सुरु होते. कोरोनामुक्त झाल्यानंतरही लता दीदींची न्यूमोनियाशी झुंज सुरूच होती. अखेर हि झुंज अपयशी झाली आणि लता दीदींना देवाज्ञा झाली. भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या स्वर सम्राज्ञीने रविवारी जगाचा निरोप घेतला. लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्य संस्कार पार पडले आणि लता दीदी अनंतात विलीन झाल्या. लता मंगेशकर यांचं जाणं म्हणजे भारतीय गायकीचं कधीही भरून न निघणारं नुकसान. त्यांच्या आवाजाने नेहमीच आपल्या कानांना तृप्त केलं आहे. ऐकुया दीदींची काही सदाबहार गीते आणि जागवूया आठवणी:-

लता दीदींची बॉलिवूड सिनेसृष्टीतील काही निवडक आणि अत्यंत गाजलेली गाणी खालीलप्रमाणे:-

1. मेरी आवाजही पहचान है’ – अल्बम

 

2. आयेगा आने वाला’ – महल १९४९

 

3. अजिब दास्तान है येह’ – ‘दिल अपना और प्रीत पराई’ १९६०

 

4. ऐ मेरे वतन के लोगों’ – अल्बम १९६३

 

5. रंगीला रे’ – ‘प्रेम पुजारी’ १९७०

 

6. एक प्यार का नगमा है’ – शोर १९७२

 

7. भींगी भींगी रातों में – ‘अजनबी’ १९७४

 

8. तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा’ – ‘आंधी’ १९७५

 

9. सत्यम शिवम सुंदरम्’ – ‘सत्यम शिवम सुंदरम्’ १९७८

 

10. परदेसिया ये सच है पिया’ – ‘मिस्टर नटवरलाल’ १९७९

 

11. लग जा गले…’ – वो जो हसिना १९८३

 

12. मिले सूर मेरा तुम्हारा’ – अल्बम मिले सूर १९८८

 

लता दीदींची मराठी सिनेसृष्टीतील काही निवडक आणि अत्यंत गाजलेली गाणी खालीलप्रमाणे:-

1. मेंदीच्या पानावर – अल्बम

 

2. मोगरा फुलाला – अल्बम

 

3. असा बेभान हा वारा – अल्बम

 

4. चाफा बोलेना – अल्बम (भावगीते)

 

5. लटपट लटपट – अमर भूपाळी १९५१

 

6. ऐरणीच्या देवा तुला – साधी माणसं १९६५

 

7. बाई बाई मनमोराचा – मोहित्यांची मंजुळा १९६९

 

8. सख्या रे घायाळ मी – सामना १९७४

 

9. मी रात टाकली – जैत रे जैत १९७७

 

10. शोधू मी किती – नाव मोठं लक्षण खोटं १९७७

 

11. सुन्या सुन्या – उंबरठा १९८२

 

12. चिंब पावसानं रान झालं – सर्जा १९८७