Take a fresh look at your lifestyle.

लता मंगेशकर हेल्थ अपडेट; जाणून घ्या काय म्हणाले डॉक्टर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना आठवडाभरापूर्वी रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांना कोरोना आणि न्युमोनियाची एकत्र लागण झाल्यामूळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यात त्यांचे वय ९२ असल्यामुळे प्रकृती चिंताजनक असल्याचे समजत असताना आता डॉक्टरांनी एक विशेष माहिती दिली आहे. तूर्तास त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांच्या तब्येतीत विशेष सुधारणा होऊ लागली आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या परवानगीनंतर लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे चाहत्यांना देखील दिलासा मिळतो आहे.

९२ वर्षीय लता दीदींची तब्येत अचानक बिघडल्यानंतर त्यांना लगेच उपचारांसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात ICU वॉर्डमध्ये शिफ्ट केले होते. यानंतर लता दीदींच्या तब्येतीची विशेष काळजी घेण्यासाठी डॉक्टरांनी त्यांची एक विशेष टीम तयार केली असलयाचे सांगितले होते. यानंतर आता लता मंगेशकर यांच्यावर उपचार सुरु असून त्यांच्यासाठी नेमलेली डॉक्टरांची टीम त्यांची विशेष काळजी घेत आहे. शिवाय त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर सतत त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. त्यानंतर आता कुठे लतादीदींच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र तरीही त्या अजून ICUमध्येच आहेत.

लता दीदींच्या प्रवक्त्या अनुषा श्रीनिवासन अय्यर यांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, सध्या लतादीदींची प्रकृती बऱ्यापैकी स्थिर आहे. त्यामुळे डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतर त्यांना लवकरच घरी आणले जाईल. गेल्या २ दिवसांपूर्वी लता दीदींची प्रकृती नाजूक असून खालवली असल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र लतादीदींच्या प्रवक्त्यांनी हे वृत्त फेटाळून लावले आणि आज त्यांची प्रकृती स्थिर असून सुधारणा असल्याचे सांगितले आहे.