Take a fresh look at your lifestyle.

आधीच्या तुलनेत लता दीदींच्या तब्येतीत सुधार; आशा भोसलेंकडून दीदींचे हेल्थ अपडेट जारी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. सध्या त्या ९२ वर्षांच्या असून तब्येतीच्या तक्रारींमुळे सतत त्रस्त असतात असे वारंवार सांगण्यात येत होते. यानंतर त्यांच्या भाचीकडून त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती मिळाली असता त्यांनी सांगितले होते कि, दीदींची प्रकृती स्थिर आहे. शिवाय त्यांच्या देखरेखीसाठी उत्तम डॉक्टरांची टीम नेमण्यात आलेली आहे. त्यामुळे तूर्तास चिंतेचे कारण नाही. यानंतर आज लता दीदींच्या लहान बहीण आणि प्रख्यात गायिका आशा भोसले यांच्याकडून दीदींच्या तब्येतीची माहिती मिळाली आहे. शिवाय दीदींना प्रत्यक्ष भेटता येत नाही याबाबत आशा भोसले यांनी खंत व्यक्त केली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, लता दीदी अजूनही ICU’मध्ये आहेत. यामुळे त्यांच्या प्रकृतीची चिंता सर्वांनाच आहे. दरम्यान दीदींच्या लहान बहीण आणि प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी कोरोनाच्या नियमांमुळे दीदीला प्रत्यक्षपणे बघू आणि भेटू न शकण्याची खंत व्यक्त केली आहे. मात्र त्यांनी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची माहिती सर्वतोपरी घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी सांगितले कि, ‘मीसुद्धा प्रत्यक्षपणे रुग्नालयात जाऊ शकत नाही. त्यामुळे मलासुद्धा रुग्णालयातून दिल्या जाणाऱ्या हेल्थ अपडेट्समधूनच माहिती मिळत आहे. खबरदारी म्हणून रुग्णालयातील डॉक्टरांनी दीदींना प्रत्यक्षपणे भेटण्यास मनाई केली आहे. त्यामुळे मीसुद्धा दीदीजवळ जाऊ शकत नाही.

पुढे म्हणाल्या कि, सध्या देशात कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. त्यामुळे वेळीच उपाययोजना करत शासनाने अनेक नियम आणि अटी लागू केल्या आहेत. त्यामुळे आपल्या हालचालींवर काहीसे निर्बंध आले आहेत.’सध्या हवामानात फारच बदल होत आहे. सातत्याने होत असलेल्या या बदलांमुळे, मलासुद्धा खोकला, सर्दी झाली आहे. त्यामुळे मी जास्तीत जास्त बाहेर जाणं टाळते. परंतु एक चांगली गोष्ट म्हणजे आधीच्या तुलनेत लता दीदींच्या प्रकृतीत सुधार झाला आहे’.