Take a fresh look at your lifestyle.

‘बालगंधर्व’तील अभिनयाबद्दल लतादीदींनी केलं सुबोध भावेंच अभिनंदन

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी अभिनेता सुबोध भावे यांच्या ‘बालगंधर्व’ चित्रपटातील अभिनयाचं कौतुक केलं आहे. लतादीदींनी ‘बालगंधर्व’ या चित्रपटाविषयी एक पोस्ट लिहिली आहे. बालगंधर्व यांची भूमिका साकारणारे सुबोध भावे आणि त्यांच्यासाठी पार्श्वगायन करणारे आनंद भाटे आणि इतर सर्व कलाकारांचं मी अभिनंदन करते. अस लता मंगेशकर म्हणाल्या.

पहा लता दीदींची संपूर्ण पोस्ट-

नमस्कार. आज मी पहिल्यांदा बालगंधर्व हा मराठी चित्रपट जो मराठी संगीत नाटकातील खूप महान कलाकार आणि तेवढेच प्रामाणिक व्यक्ती बालगंधर्वजी यांच्या आयुष्यावर आधारित आहे. बालगंधर्व यांना मी दोन-तीन वेळा भेटले, ते खूप प्रेमाने मला भेटायचे, आशीर्वाद द्यायचे. माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात मी त्यांना शिवाजी पार्क येथे आमंत्रित केलं होतं, तेव्हा तेथे येऊन त्यांनी दोन भजनंसुद्धा गायली. हा चित्रपट पाहताना मला त्या सर्व गोष्टी आठवल्या. त्यांच्या जीवनातील काही गोष्टी ज्या मला माहित नव्हत्या, त्या मला चित्रपटाच्या माध्यमातून समजल्या. हा चित्रपट खूप चांगला आहे आणि बालगंधर्व यांची भूमिका साकारणारे सुबोध भावे आणि त्यांच्यासाठी पार्श्वगायन करणारे आनंद भाटे आणि इतर सर्व कलाकारांचं मी अभिनंदन करते. त्याचसोबत एक फोटो ज्यामध्ये वसंत देसाई, मी, बालगंधर्वजी, बेगम अख्तरजी आणि मोगुबाई कुर्डीकरजी आहेत, तो इथे जोडते.

अभिनेता सुबोध भावे यांनी लतादीदींची ही पोस्ट शेअर केली. ‘साक्षात सरस्वतीदेवीकडून कौतुक, अजून काय हवं? आयुष्य सार्थकी लागलं, लतादीदी तुम्हाला साष्टांग नमस्कार’, अशा शब्दांत सुबोधने त्यांचे आभार मानले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’