Take a fresh look at your lifestyle.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती ढासळली; चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोना आणि न्युमोनियाची एकत्र लागण झाल्यामूळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान त्यांचे वय ९२ असल्यामुळे प्रकृतीच्या दृष्टिकोनातून त्यांना आयसीयूवॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. मध्यंतरी त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली होती. असे वृत्त बाहेर आले होते. यानंतर आता पुन्हा एकदा लता दीदींची प्रकृती ढासळली आहे. गेल्या महिन्याभरापासून लता दीदींच्या तब्येतीत सुधारणा होत असताना अचानक त्यांची तब्येत बिघडल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

ANI’ने दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा ढासळली आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. यामुळे प्रकृतीच्या दृष्टीकोनातून त्यांना पुन्हा एकदा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. यामुळे त्या अजूनही आयसीयू वॉर्डमध्ये आहेत आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहील. अशी माहिती डॉ प्रतित समदानी यांनी दिली आहे. ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये लता दीदींवर डॉ. प्रतीत समदानी यांच्या निदर्शनाखाली उपचार सुरु आहेत.

अगदी काहीच दिवसांपूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लता दीदींच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. दरम्यान टोपे यांनी सांगितले होते कि, लता दीदी आता कोरोनामुक्त झाल्या असून त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. यानंतर लता दीदींच्या प्रमुख प्रवक्त्यांनीदेखील लता दीदींच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे सांगितले होते. यापूर्वी त्यांची एक्सट्यूबेशनची (तीव्र व्हेंटिलेटर बंद करून पाहिला) चाचणी करण्यात आली होती. दरम्यान त्यांची प्रकृती सुधारण्याची आंशिक चिन्हे दिसत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. यानंतर आज अचानक लता मंगेशकर यांची प्रकृती ढासळली आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे.