Take a fresh look at your lifestyle.

लतादीदींची प्रकृती जैसे थे।; कुटुंबियांकडून चाहत्यांना प्रार्थना करण्याचे आवाहन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून अनेक बातम्या प्रसिद्ध होताना दिसत आहेत. दीदींना कोरोना आणि न्युमोनियाची एकत्र लागण झाल्यामूळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान त्यांचे वय ९२ असल्यामुळे प्रकृतीच्या दृष्टिकोनातून त्यांना आयसीयू वॉर्डमध्ये दाखल केले आहे. मात्र तेव्हापासून जवळजवळ आठवड्याहून अधिक दिवस होऊन गेले त्या अजूनही आयसीयुतच आहेत. यानंतर त्यांच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीदींची प्रकृती होती तशीच आहे. विशेष सुधारणा नसल्यामुळे प्रार्थनेचे आवाहन केले जात आहे.

माहितीनुसार, अजूनही दीदींवर आयसीयूमध्येच उपचार सुरु आहेत. अलीकडेच डॉक्टरांच्या परवानगीनंतर लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र त्यानांतर आज चिंताजनक बाब समोर येत आहे. दीदींची तब्येत मागील अनेक दिवसांपासून खालावली आहे. त्यामुळे त्या अनेक दिवसापासून आयसीयूमध्ये आहेत. त्या अगदी ठीक आहेत, व्यवस्थित आहेत. अशा बातम्या एकीकडे प्रसिद्ध होत असताना या सर्व बातम्या चुकीच्या बातम्या आहेत असे आज सांगण्यात येत आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये अजून काहीही सुधारणा झाली नाही. म्हणून त्या अजूनही आयसीयूमध्ये आहेत, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून आली आहे.

दरम्यान, दीदींबाबत चुकीच्या बातम्या पसरत असल्याने त्यांच्या कुटुंबियांनी एक आवाहन केले आहे. याबाबत प्रवक्त्या अनुषा अय्यर यांनी सांगितले की, “दीदी लवकर बऱ्या व्हाव्यात आणि लवकर घरी याव्यात म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी सगळ्यांना प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.” लतादीदी यांच्या तब्येतीत सुधारणा झाली नसली, तरी देखील त्यांची तब्येत सध्या स्थिर आहे. परंतु त्या अजूनही आयसीयूमध्ये आहेत. त्यामुळे चुकीच्या बातम्या पसरवू नका, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. त्यांच्या अनेक चाहत्यांना त्यांच्या तब्येतीची काळजी आहे म्हणून हे आवाहन करीत आहोत.