Take a fresh look at your lifestyle.

अखेरचा निरोप! सिद्धार्थ शुक्लाच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची गर्दी; ओशिवरात होणार अंत्यसंस्कार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कालचा दिवस मनोरंजन सृष्टीसाठी अत्यंत दुःखाचा काळा दिवस ठरला. कारण कालच्याच दिवशी मनोरंजन सृष्टीने एक हरहुन्नरी कलाकार गमावला आहे. बिग बॉस १३ चा विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले आहे. गुरुवारी सकाळी त्याने संपूर्ण जगाचा निरोप घेतला. यानंतर आज मुंबईत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. सिद्धार्थचे पार्थिव आज सकाळी ११ वाजता त्याच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात येईल. माहितीनुसार, सकाळी सिद्धार्थचं पार्थिव ब्रम्हकुमारी कार्यालयात नेण्यात आले आहे. यानंतर पूजा पाठ करून त्याचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणणार आहेत. सिद्धार्थ ओशिवरा येथे स्थित होता त्यामुळे ओशिवराच्या वैकुंठभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

सिद्धार्थचा मोठा चाहता वर्ग असल्यामुळे त्याच्या चाहत्यांनी मोठ्या संख्येने त्याचे अंत्य दर्शन करण्यासाठी त्याच्या घराबाहेर गर्दी केली आहे. सिद्धार्थची अकाली एक्झिट अद्यापही कुणालाच मान्य नाही. भरल्या डोळ्यांनी हुंदके देत त्याचे चाहते त्याच्या अंत्य दर्शनासाठी व्याकुळ झाले आहेत. सिद्धार्थच्या निधनामुळे त्याचे कुटुंबीय अत्यंत दुखी असून त्याची आई धक्क्यातून सावरेना झाली आहे.

तर सिद्धार्थची अत्यंत लाडकी मैत्रीण शेहनाझ कुणाशीही न बोलण्याच्या मनस्थिती असल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले आहे. शिवाय त्याचे लाखो फॅन्स, जवळचे नातेवाईक आणि इतर मित्र मैत्रिणींकडूनही शोक व्यक्त केला जात आहे.

बिगबॉस शोमधून नावरुपास आलेली सिडनाझची जोडी आज अचानक दैवाने तोडली. त्याच्या जाण्याने शेहनाझवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बिग बॉसमध्ये सिद्धार्थ आणि शेहनाझची गट्टी जमली आणि यानंतर शो संपूनही ते अनेकदा एकत्रच दिसायचे. त्यांची जोडी सोशल मीडिया आणि मनोरंजन सृष्टीत अत्यंत लोकप्रिय होती. त्यांचे अनेको चाहते आहेत. सिद्धार्थच्या जाण्याने शेहनाझ इतकी कोलमडली आहे कि, तिची प्रकृती बिघडली असल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले आहे.

शेहनाझचे वडील संतोख सिंग सुख यांनी स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले कि, “आता काहीही बोलण्याच्या मनस्थितीत मी नाही. जे काही झालं त्यावर माझा विश्वास बसत नाही.””माझं तिच्याशी बोलणं झालं. ती बरी नाही. माझा मुलगा शेहबाझ तिच्याकडे मुंबईला जात आहे. मीही नंतर जाणार आहे.”

Leave A Reply

Your email address will not be published.