Take a fresh look at your lifestyle.

ट्रेडिंग गाण्यावर थिरकली लतिका आणि मंडळी; पहा भन्नाट व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । सुंदरा मनामध्ये भरली या कार्यक्रमातील चाहत्यांच्या आवडत्या लतिकाने नुकताच एक व्हिडीओ अपलोड केला आहे. मास्टर चित्रपटातील गाण्यावर सहकलाकारांसोबत डान्स करीत इन्स्टा आय डी वर हा व्हिडीओ तिने शेअर केला. सध्या हा व्हिडीओ वायरल व्हिडीओस पैकी एक असून चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

मालिकेतील मुख्य पात्र लतिका म्हणजेच अक्षया नाईक हिने आपल्या अभिनयाने सर्वांच्याच मनीचा ठाव घेतला आहे. अक्षया हि निर्माते अरविंद नाईक यांची सुकन्या असून आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने हिंदी ते मराठी मालिका असा पल्ला गाठला आहे. हिंदी मालिका ये रिश्ता क्या केहलता है, ढाई किलो प्रेम, ये रिश्ते है प्यार के ते मराठी सीरिअल सुंदरा मनामध्ये भरली हा प्रवास अक्षयाने साधला आहे. मुख्य म्हणजे तिच्या भूमिकेची चर्चा आणि कौतुक तिच्या दिसण्यावरून नव्हे तर तिच्या आपलेपणातल्या अभिनयामुळे होत आहे.

सोशल मीडियाशी कनेक्ट असलेली अक्षया हिने अन टॅग या वेब सिरीजमध्ये सुद्धा काम केले आहे. ती नेहमीच पडद्यामागील मजेशीर प्रसंग तिच्या प्रोफाइल वर पोस्ट करत असते. सध्या ती साकारत असलेली लतिका हि भूमिका घराघरांत पोहोचली आहे. इतकेच नव्हे तर लति वर प्रेक्षकांच्या प्रेमाचा सुखद वर्षाव तीच्या प्रोफाइल वॉल वर पाहायला मिळतो.

ट्रेंडिंग गाण्यावर थिरकणारे सहकलाकार आणि लति यांचा हा ट्रेंड व्हिडीओ सोशल मीडियाचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाला, असे म्हणायला काहीच हरकत नाही. तसेच अक्षयाच्या कॉन्फिडन्ट पर्फोमन्समुळे सुंदरा नक्कीच मनामध्ये भरली आणि भिनली सुद्धा हे नक्की. वेल डन लते !

Leave A Reply

Your email address will not be published.