Take a fresh look at your lifestyle.

लाफ्टर क्वीन भारती झाली आई; गोड मुलाच्या जन्माने आनंदले सिंग – लिंबाचिया कुटुंबीय

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रेक्षकांना पोट धरून खळखळून हसवणारी कॉमेडी क्वीन भारती सिंग- लिंबाचियाच्या आयुष्यात अखेर ते सुख आलंच. ज्याची ती वाट पाहत होती. भरतीचा पती हर्षने सोशल मीडियाच्या माध्यमातून तो बाबा आणि भारती आई झाल्याचे सांगितले आणि सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. भारतीने रविवारी एका गोड मुलाला जन्म दिला आहे आणि तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. या पोस्टवर मनोरंजन सृष्टीतील अनेकांनी शुभेच्छा आणि प्रेम दिले आहे. तर चाहत्यांचा आनंद गगनात मावेना झाला आहे.

भारतीला मुलगा झाल्याची बातमी समजताच सोशल मीडियावर आनंदाला उधाण आलं आहे. या पोस्टवर भारती आणि हर्ष यांचे चाहते भरभरून कमेंट करीत आहेत. तर मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरसह राहुल वैद्य यानेही भारती आणि हर्ष यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अर्जुन बिजलानी, नेहा पेंडसे, अनिता हसनंदानी, जय भानुशाली, नेहा कक्कर, रिचा शर्मा अश्या प्रत्येक इंडस्ट्रीशी संबंधित व्यक्तींनी हर्ष आणि भरतीला त्यांच्या आई बाबा होण्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

याआधी भारतीला नववा महिना सुरु असतानाही ती शूटिंगमध्ये व्यस्त होती. दरम्यान एक अफवा पसरली होती. हि अफवा म्हणजे भारतीने एका मुलीला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर हि बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि विविध चर्चा, शुभेच्छा सदिच्छा मिळू लागल्या. पण हि बातमी सपशेल खोटी असल्याचे नंतर स्पष्ट झाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

पण आता खरोखरच भारती आई झाली आहे आणि तिच्या आयुष्यात एका गोड बाळाची एंट्री झाली आहे. यामुळे तिचा पती आणि लेखक हर्ष लिंबाचिया आणि भारतीचे सिंग कुटुंब अगदी उत्साह साजरा करीत आहेत.