Take a fresh look at your lifestyle.

….म्हणून तेव्हा रियाने सुशांतचे घर सोडण्याचा निर्णय घेतला ; वकिलांनी केला मोठा खुलासा

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचे गूढ अद्याप उलगडलेले नाही . या प्रकरणातील मुख्य आरोपी रिया चक्रवर्ती हिने नुकतच सुशांतच्या बहिणींविरोधात तक्रार दाखल केली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय प्रिस्क्रिप्शनमध्ये बदल करून सुशांतला चुकीची औषधं दिल्याचा आरोप त्याच्या बहिणी मितू सिंह आणि प्रियांका सिंह यांच्यावर रियाने केला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करणं आमचं कर्तव्य असल्याचं म्हणत प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे आणि रियाचा एफआयआर दाखल करून घेतला आहे. डॉक्टरांनी सुशांतला ड्रग्सचं सेवन बंद करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर त्याने रिया चक्रवर्तीचा आणि डॉक्टरांचा सल्ला न ऐकल्याने अखेर सुशांतच्या इच्छेनुसार तिने त्याचे घर सोडण्याचा निर्णय घेतल्याचे रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सांगितले.

“प्रियांका आणि मितू यांच्याविरूद्ध एफआयआर नोंदवण्यात आला असून रिया चक्रवर्तीने दिलेल्या माहितीनुसार हा एफआयआर नोंदवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. मुंबई मिररच्या वृत्तानुसार रिया चक्रवर्ती हिचे वकील सतीश मानेशिंदे यांनी या दोन बहिणींवर आरोप केले होते. सुशांतच्या दोन्ही बहिणींनी त्याच्या मानसिक परिस्थितीचा अंदाज असताना देखील चुकीची औषधे दिल्याचा आरोप त्यांनी केला होता.

त्याचबरोबर सुशांतसिंह हा मानसिक आजारी असून मुंबईत उपचार घेत असल्याचं माहीत असतानादेखील त्याच्या कुटुंबीयांनी त्याला ही औषधे देणं सुरूच ठेवल्याचा आरोप रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी केला आहे. त्याचबरोबर सुशांतला पाच डॉक्टरांनी त्याची मानसिक स्थिती पाहून ड्रग्स घेण्याचं थांबवायला सांगितलं होतं, परंतु त्याने रिया चक्रवर्तीचा आणि डॉक्टरांचा सल्ला न ऐकल्याने अखेर सुशांतच्या इच्छेनुसार तिने त्याचे घर सोडण्याचा निर्णय घेतल्याचेदेखील मानेशिंदे यांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.