Take a fresh look at your lifestyle.

दिलीपकुमार यांचा लहान भाऊ एहसान खान यांचाही कोरोनामुळे मृत्यू

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता दिलीप कुमारच्या घरी दुःखाचा डोंगर कोसळला आहे.काही दिवसांपूर्वी दिलीपकुमारचा छोटा भाऊ अस्लम खान यांचे निधन झाले होते आणि आता आणखी एक धाकटा भाऊ एहसान खान यांचे निधन झाल्याची बातमी समोर येत आहे. वास्तविक, दिलीप कुमार यांचे दोन्ही बंधू अस्लम आणि एहसान खान यकोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले, त्यानंतर त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. 21 ऑगस्ट रोजी असलम खान यांचे निधन झाले आणि आज एहसान खान यांचे निधन झाले आहे.

दिलीपकुमार यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन एका ट्विटद्वारे ही माहिती देण्यात आली असून हे ट्विट दिलीप साहेबांचे कुटुंब मित्र फैजल फारुकी यांनी केले आहे. या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, ‘दिलीप साहेबांचा धाकटा भाऊ एहसान खान काही तासांपूर्वी निधन पावला. यापूर्वी धाकटा भाऊ अस्लम खान यांचे निधन झाले होते. कृपया त्यांच्यासाठी प्रार्थना करा. ट्विटच्या शेवटी असेही लिहिले आहे की हे ट्विट दिलीप कुमार यांच्या वतीने फैजल फारुकीने केले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार दिलीपकुमार यांची प्रकृती अद्याप ठीक आहे. हे दोन भाऊ दिलीप कुमार यांच्यापासून वेगळे राहतात. दिलीप कुमार हे 97 वर्षांचे आहेत आणि त्यांची पत्नी सायरा बानो त्यांची पूर्ण काळजी घेते. सायरा दिलीपकुमारची तब्येत वेळोवेळी आपल्या चाहत्यांशी सोशल नेटवर्किंग साईटवरुन शेअर करत असते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’