Take a fresh look at your lifestyle.

दाक्षिणात्य दिग्गज अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचं निधन

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | दाक्षिणात्य अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचं आज निधन झाल आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच निधन झालं असून एएनआय ने यासंदर्भात ट्विट केलं आहे.जयप्रकाश रेड्डी हे ७३ वर्षांचे होते. जयप्रकाश रेड्डी हे तेलुगू चित्रपटामधील लोकप्रिय विनोदवीर अभिनेते म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण दाक्षिणात्य कलाविश्वावर शोककळा पसरली असून अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

दाक्षिणात्य कलाकारांसोबत आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नायडू यांनीदेखील ट्विट करुन रेड्डींना आदरांजली वाहिली आहे. “जयप्रकाश रेड्डी गुरू यांचं निधन झाल्यामुळे तेलुगू चित्रपट आणि रंगमंच यांनी एक हिरा गमावला आहे. गेले कित्येक वर्षांपासून वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि स्मरणात राहतील असे चित्रपट दिले. या कठीण प्रसंगात आम्ही त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत”, असं ट्विट नायडू यांनी केलं आहे.

जयप्रकाश रेड्डी यांनी ब्रह्मपुत्रुडु या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी ‘चेन्नाकेशवारेड्डी’, ‘सीथाया’ ‘प्रेमिचुकुंदम रा’, ‘गब्बर सिंह’, आणि ‘टेंपर’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news