Take a fresh look at your lifestyle.

सायली संजीवच्या घरी इटुकल्या पिटुकल्या चिमुकल्यांचे आगमन; सोशल मीडियावर केली पोस्ट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेत्री आणि सर्वांसाठी ओळखीचा चेहरा असलेली सायली संजीव सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. इतकी कि आपल्या प्रोजेक्ट व्यतिरिक्त तिच्या खाजगी आयुष्यात काय सुरु आहे त्या प्रत्येक गोष्टीबद्दल ती आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावर पोस्ट करून सांगताना दिसते. आता नुकत्याच तिने केलेल्या पोस्टमध्ये तिने आपल्या घरी आनंद आल्याचे सांगितले आहे. हा आनंद चिमुकल्या पावलांनी तिच्या घरी आला आहे. हि चिमुकली पावलं आहेत तिच्या घना आणि ओवीच्या पिल्लांची.

घना आणि ओवी हि सायलीच्या पेट्सची म्हणजेच पाळीव कुत्र्यांची नावे आहेत. या दोघांनाही पिल्लं झाल्यानंतर त्यांच्यासोबत फोटोशूट करून सायलीने हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या उत्साहाने शेअर केले आहेत. इतकेच नव्हे तर यासोबत सुंदर कॅप्शनदेखील तिने दिलं आहे. सायलीने खूप सगळे फोटो शेअर करताना लिहिले कि, माझा आनंद… माझं प्रेम आमच्या घरी आलंय… त्यांच्या येण्याने घरात आनंद पसरलाय”, खूप खूप धन्यवाद @sjnanand आणि @patilshriya, घना आणि ओवी सुंदर, सुबक बाळासाठी.. मी फक्त आनंदी आहे.. खूप आनंदी आहे.. खूप खूप धन्यवाद!

तिच्या या पोस्टवरून तिचा ओघळणारे आनंद समजून येतोय. शिवाय तिचं आपल्या पेट्सवर असलेलं प्रेमदेखील दिसून येत आहे. या फोटोंमध्ये सायलीच्या चेहऱ्यावर ओसंडणारा आनंद स्पष्ट दिसतोय. यात ती चिमुकल्या लहान पिल्लांसोबत मजा करताना दिसत आहे. सायलीच्या या पोस्टवर आणि प्रत्येक फोटोवर सोशल मीडिया युजर्स आणि कलाकारांकडून भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. याआधीही सायलीने तिचं श्वानप्रेम दाखवणारे काही फोटो शेअर केले होते आणि त्यावरही तिच्या चाहत्यांनी भरपूर कमेंट्स केल्या होत्या.