Take a fresh look at your lifestyle.

‘लोक काय म्हणतील?’, उदाहरणार्थ निर्मित आणखी एका चित्रपटाची जोरदार चर्चा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच काही दिवसांपूर्वी एक अनोखं शीर्षक असलेला चित्रपट 8 दोन 75 : फक्त इच्छाशक्ती हवी! याची चर्चा सोशल मीडियावर अगदी जोरात चालू होती. याचं पूर्ण श्रेय जातं ते दिग्दर्शक सुश्रुत भागवत आणि उदाहरणार्थ प्रोडक्शनला. आता यानंतर ‘लोक काय म्हणतील?‘ अशा लक्षवेधी शीर्षकासह आणखी एका नव्या चित्रपटाची घोषणा त्यांनी केली आहे. सोशल मीडियावर पोस्टर लॉन्च झाल्यानंतर फक्त आणि फक्त याचीच चर्चा आहे. चित्रपटांतील कलाकार, चित्रपटाचा विषय सगळं काही हळूहळू सांगितलं जाईल. ‘लोक काय म्हणतील?’ या युनिव्हर्सल चिंतेबाबत चित्रपट येतोय हीच एक कमल योजना आहे.

उदाहरणार्थ या निर्मिती संस्थेनं यापूर्वी चिडिया, कागर अशा उत्तम चित्रपटांची निर्मिती केली आहे. तसेच सुश्रुत भागवत यांनीही दर्जेदार कथानकांसह काम केले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘8 दोन 75 : फक्त इच्छाशक्ती हवी’ हा चित्रपट अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये पन्नासहून अधिक पुरस्कारांचा मानकरी ठरला आहे. तसेच मुंबई टाइम, पेईंग घोस्ट, असेही एकदा व्हावे या चित्रपटांचे दिग्दर्शन देखील सुश्रुत यांनीच केले आहे. त्यामुळे उदाहरणार्थ निर्मित लोक काय म्हणतील? या चित्रपटाचं दिग्दर्शन सुश्रुत भागवत करणार आहेत हे ऐकूनच हायसं वाटू लागलं आहे. तसेच सुश्रुत आणि शर्वाणी पिल्ले यांनी कथा व पटकथा याचं लेखन केलं आहे.

सुश्रुत भागवत दिग्दर्शित ‘8 दोन 75 : फक्त इच्छाशक्ती हवी’ या चित्रपटाने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये पन्नासहून अधिक पुरस्कार पटकावल्यामुळे प्रेक्षकांच्या आगामी चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. दरम्यान चित्रपटांतील कलाकार, चित्रपटाचा विषय जाहीर केला नसला तरीही लोक काय म्हणतील..? याबाबत नेहमीच सगळ्यांना कुतूहलता असते नाही का. त्यामुळे उदाहरणार्थ निर्मित आणि सुश्रुत भागवत दिग्दर्शित ”लोक काय म्हणतील?” या चित्रपटाविषयी कुतुहल असेलच असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.