हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन क्षेत्रात संजय पारेकर, सचिन पारेकर यांच्या अमोल प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेने एक विशेष ओळख निर्माण केली आहे. नाटक, टीव्ही मालिका आणि चित्रपट निर्मिती, वितरणाच्या क्षेत्रात या संस्थेने स्वतःची नाममुद्रा उमटवली आहे. याशिवाय त्यांनी अमोल टीव्ही या ओटीटी प्लॅटफॉर्मची निर्मिती केली आहे. अमोल टीव्ही या प्लॅटफॉर्मवर ‘लव्हस्टोरी आहे ही’ हे नवंकोरं रोमँटिक गाणं रिलीज करण्यात आलं आहे. या नव्या म्युझिक व्हिडिओची प्रस्तुती चित्रकला मोशन पिक्चर्स आणि अमोल प्रॉडक्शन्स यांनी केली आहे.
निस्सी जस्टिन आणि राहुल सूर्यवंशी यांनी या म्युझिक व्हिडिओचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. तर राहुल सूर्यवंशी यांनी गीतलेखन केलं आहे. चैतन्य देवढे (माऊली) आणि प्रिया चिंचोलकर यांनी हे गाणं गायलं आहे. तर या गाण्यात प्रमोद साखरे आणि आर्या घारे या फ्रेश जोडीची रोमँटिक केमिस्ट्री पहायला मिळत आहे.
या गाण्याचे दिग्दर्शन अजगर अली यांनी केले असुन प्रशांत जाधवर यांनी सहायक दिग्दर्शन केले आहे. उत्तम संगीत, सहजसोपे आणि गोष्ट उलगडणारे शब्द यांचा सुरेल मिलाफ या म्युझिक व्हिडिओमध्ये जुळवून आणला आहे. त्यामुळे हा म्युझिक व्हिडिओ प्रेक्षकांची पसंती मिळवेल अशी अशा मेकर्सने व्यक्त केली आहे.
संजय पारेकर आणि सचिन पारेकर यांच्या संकल्पनेतून अमोल टीव्ही या ओटीटी प्लॅटफॉर्मची निर्मिती झाली आहे. पारेकर यांनी निर्मिती केलेल्या ‘शेजारी- शेजारी’, ‘लपंडाव’, ‘क्षण’, ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत’ असे अनेक चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारांसह विविध पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. त्याशिवाय ८०हून अधिक चित्रपटांचे वितरण अमोल प्रॉडक्शन्सने राज्यभरात केले आहे. अमोल टीव्ही ओटीटीवर उत्तमोत्तम चित्रपट, म्युझिक व्हिडिओचा खजिना उपलब्ध करून देण्यात येत आहे.
Discussion about this post