Take a fresh look at your lifestyle.

लकीमॅन- दिवंगत अभिनेता पुनीथ कुमारच्या शेवटच्या चित्रपटाचे पोस्टर रिलीज; पहा फोटो

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कन्नड चित्रपट सृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेता पुनीथ कुमार याचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले होते. यानंतर संपूर्ण दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा पसरली होती. शिवाय त्याच्या चाहत्यांमध्येही शोक व्यक्त केला जात होता. अद्यापही त्याचे निधन झाल्याची घटना त्याचे चाहते पचवू शकलेले नाहीत. यानंतर पुनीथच्या चाहत्यांना दिलासा देणारी बातमी म्हणजे त्यांच्या लाडक्या अभिनेत्याचा शेवटचा चित्रपट लवकरच त्यांच्या मनोरंजनासाठी रिलीज होईल. या चित्रपटाचे नाव लकीमॅन असे आहे. तूर्तास या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे.

लकीमॅन हा चित्रपट कन्नड चित्रपट असून त्याचे फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. हा चित्रपट कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमारच्या चित्रपटांपैकी एक असल्यामुळे हि बातमी त्याच्या चाहत्यांना अत्यंत भावनिक करणारी आहे. या चित्रपटामध्ये पुनीथ कुमारने शेवटचे काम केले होते. लकीमॅन हा कन्नड चित्रपट ‘ओह माय कडवुले’ या तामिळ चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे. लकीमन या चित्रपटामध्ये डार्लिंग कृष्णा, संगीता शृंगेरी आणि रोशनी प्रकाश मुख्य भूमिकेत आहेत. तर कृष्णाने याआधीही पुनीत राजकुमारसोबत चित्रपटांमध्ये काम केले आहे.

पुनीथ राजकुमार हे १७ मार्च १९७५ रोजी जन्मले आणि त्यांना अप्पू म्हणून ओळखले जायचे. त्यांनी २९ चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम केले होते. लहानपणी ते अनेक चित्रपटांमध्ये दिसले. यानंतर कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार म्हणून ते ओळखले जाऊ लागले. संतोष आनंदद्रम दिग्दर्शित आणि विजय किरगंदूर निर्मित होंबळे फिल्म्स या बॅनरखाली बनलेल्या युवारथनामध्ये शेवटचे पुनीथ दिसले होते. यानंतर आता लकीमॅन या चित्रपटातून पुनीत शेवटचे मनोरंजन करताना दिसेल.