Take a fresh look at your lifestyle.

RSS’चे समर्थक तालिबानी मानसिकतेचे?; गीतकार जावेद अख्तरांची नव्या वादात उडी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लोकप्रिय गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) तुलना तालिबान्यांसोबत केली आहे. तालिबानी प्रवृत्ती रानटी असल्याचे म्हणत आरएसएसला समर्थन करणाऱ्या लोकांनी आत्मचिंतन करायला पाहिजे, असे परखड मत जावेद अख्तर यांनी व्यक्त केले आहे. जावेद अख्तर यांच्या परखड मतामुळे आता नवा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

जावेद अख्तर म्हणाले, ज्या पद्धतीनं तालिबानी हे मुस्लिम राष्ट्र निर्माण करण्यासाठी हिंसक प्रयत्न करत आहेत. त्याच पद्धतीनं आपल्याकडे काहीजण हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडतात. हे लोकही त्याच मानसिकतेचे आहेत. तालिबानी हिंसक आहेत. रानटी आहेत. पण आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांचे समर्थन करणारे लोकही त्याच मानसिकतेचे आहेत”, असं जावेद अख्तर म्हणाले.

दरम्यान, भारतातील मुस्लिम तरुण चांगलं जीवन, रोजगार, चांगलं शिक्षण या गोष्टींच्या मागे लागले आहे. मात्र मुस्लिमांचा असा एक लहानसा गट आहे, जो स्त्री-पुरुष असा भेदभाव करत असून समाजाला मागे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. पण भारतातील बहुतांश लोकसंख्या धर्मनिरपेक्ष असून ते एकमेकांचा आदर करतात. यामुळे तालिबानी विचार त्यांना आकर्षित करू शकत नाहीत. म्हणूनच भारत आताही आणि भविष्यातही कधीच तालिबानी बनू शकत नाही, असा विश्वास अख्तर यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.