Take a fresh look at your lifestyle.

कौतूक करावे तेवढे कमीच! आर. माधवनची पत्नी सरीता घेतेय गरीब मुलांचे ऑनलाईन क्लास

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता आर. माधवन सध्या सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय आहे. नुकताच त्याने एक व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्याची लोकांमध्ये खूप चर्चा होतेय. त्याने शेअर केलेल्या व्हिडीओत त्याची पत्नी सरीता बिरजे ही गरीब मुलांना शिकवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावरील युजर्स तिचे भरभरून कौतुक करीत आहेत.

आर माधवनने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आर माधवनची पत्नी सरिता बिरजे गरीब मुलांचे ऑनलाइन क्लास घेताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना आर माधवन याने लिहिले, ‘जेव्हा पत्नी तूम्हाला लहान असल्याची जाणीव करून देते.’ या व्हिडिओत आर. माधवन म्हणतोय, ‘जेव्हा तुमची पत्नी देशातील गरीब मुलांना ऑनलाइन शिकवत असते आणि तुम्ही काहीच करत नसता.’ हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तसेच सर्व स्तरांवरून सरितावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

आर. माधवनची पत्नी सरीता बिर्जे या मूळ महाराष्ट्रातील नागपुर येथल्या आहेत. १९९९ साली त्यांची लग्नगाठ आर. माधवन सोबत बांधली गेली. त्या व्यवसायाने कॉस्ट्यूम डिझाइनर आहेत. ऑस्ट्रियातील क्लेजेनफर्ट येथे त्यांचे स्वतःचे ‘सरिता’ हे डिझाइनर बुटीक आहे.

आर. माधवन ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट हेरगिरीच्या खोट्या आरोपाखाली तुरुंगात गेलेल्या एरोस्पेस अभियंता नंबी नारायणन यांच्या जीवनाचे भाष्य करणारा आहे. या चित्रपटाचा ट्रेलर १ एप्रिलला रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटात अभिनेता आर. माधवन याने नंबी यांची भूमिका साकारली आहे. ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ हिंदी, तेलुगू, मलयालम, तमिल, अंग्रेजी आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.