Take a fresh look at your lifestyle.

माधुरी इज बॅक! ‘द फेम गेम’ वेबसीरिजच्या माध्यमातून धकधक गर्लचे ओटीटीवर पदार्पण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री जिला आजही लोक धकधक गर्ल म्हणून ओळखतात तिचे वेगळे असे नाव घेण्याचीही गरज पडत नाही टीम म्हणजे लाखों दिलों कि धडकन माधुरी दीक्षित. माधुरीने आजवर विविध चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे अव्वल मनोरंजन केले आहे. चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या सौंदर्याची भुरळ पडणारी माधुरी अलीकडे टेलिव्हिजनवर विविध डान्स रिएलिटी शोमध्ये परीक्षक भूमिकेत दिसून येत आहे. यानंतर आता बऱ्याच दिवसांनी माधुरी ओटीटीविश्वात झळकणार आहे. ‘द फेम गेम’ या वेबसीरिजच्या माध्यमातून माधुरी आपल्या चाहत्यांचे भरभरून मनोरंजन करताना दिसणार आहे. तेव्हा चाहत्यांची प्रतिक्षा आता संपली आहे. खूप दिवसांनी का होईना पण धकधक गर्ल इज बॅक!

‘द फेम गेम’ या वेबसिरीजमधून माधुरी दीक्षित ओटीटीवर पदार्पण करत असल्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये एक वेगळेच आनंदाचे वातावरण आहे. हि वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या या वेबसिरीजमधून माधुरी पहिल्यांदाच वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याआधी ‘फाईंडींग अनामिका’ असं या वेबसिरीजं नाव होतं. मात्र हे नाव काही कारणास्तव बदलण्यात आले आहे आणि ते नाव बदलून आता ‘द फेम गेम’ असे केले आहे. त्यामुळे ‘द फेम गेम’ या नावाने ही सिरीज प्रदर्शित होणार आहे.

अलीकडेच याचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. याबाबत माधुरीने सोशल मिडीयावर पोस्टर शेअर करून चाहत्यांना हि आनंदाची बातमी दिली आहे. बिजॉय नांबियार आणि करिश्मा कोहली दिग्दर्शित ही एक सस्पेन्स सिरीज आहे. यामध्ये माधुरी अनामिका आनंदच्या भूमिकेत असून तिच्या आयुष्यावर ही सिरीज आधारीत आहे. एका बॉलीवुड स्टारचं आयुष्य कसं असतं हे यामधून प्रेक्षकांना पाहता येईल. येत्या २५ फेब्रुवारी २०२२ रोजी माधुरीची ही पहिली वहिली ओटीटी सिरीज नेटफ्लिक्स या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. या सिरीजमध्ये माधुरीसोबत, संजय कपूर, मानव कौल, सुहासिनी मुळ्ये, लक्ष्यवीर सरन हे कलाकार देखील अन्य मुख्य भूमिकेत दिसतील.