Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मांजरेकरांच्या आगामी चित्रपटात माधुरी पवारची वर्णी; साकारणार ऐतिहासिक भूमिका

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 21, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Madhuri Pawar
0
SHARES
57
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘महाराष्ट्राची महाअप्सरा’ म्हणून ख्याती असणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना माधुरी पवारची फॅन फॉलोईंग एकदम जबरदस्त आहे. टीव्ही मालिका, वेब सिरीजच्या माध्यमातून माधुरीने तिची अदाकारीच नव्हे तर अभिनय कौशल्य देखील दाखवले आहे. तिच्या एक एक कटाक्षावर अख्खा महाराष्ट्र फिदा झाला आहे. अशातच आता अभिनेत्री आणि नृत्यांगना माधुरी पवार लवकरच एका ऐतिहासिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Madhuri Pawar (@madhuripawarofficial)

उत्तम अभिनयासह, सुंदर नृत्य सादर करण्याची कला अवगत असलेली माधुरी पवार नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. छोट्या पडद्यावरील ‘तुझ्या जीव रंगला’ मालिकेतील ‘वहिनीसाहेब’ ही व्यक्तिरेखा तिने अव्वल साकारली. शिवाय प्लॅनेट मराठीच्या ‘रानबाजार’ वेब सिरीजमध्ये माधुरीने राजकारणातील एक अतिशय करारी आणि धडाडीच्या प्रेरणा सयाजीराव पाटील सानेची भूमिका साकारली होती. या पात्रातील बारीकी समजून तिने या भूमिकेला योग्य न्याय दिल्याबद्दल प्रेक्षकांनीच नव्हे तर समीक्षकांनीही तिचे कौतुक केले होते. त्यामुळे अभिनयातील तिची सरसता पाहून महेश मांजरेकरांनी आपल्या आगामी प्रोजेक्ट्साठी तिची निवड केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Mahesh Manjrekar (@maheshmanjrekar)

मराठी तसेच बॉलिवूड सिनेविश्वातील लोकप्रिय लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता महेश मांजरेकर यांच्या आगामी बहुचर्चित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या भव्य ऐतिहासिक चित्रपटात माधुरीची वर्णी लागली आहे. या चित्रपटात ती अत्यंत महत्वपूर्ण भूमिका साकारत असल्याचे समोर आले आहे. अद्याप माधुरी पवारच्या पदरी नेमकी कोणती व्यक्तिरेखा आली आहे हे गुलदस्त्यात आहे. यासाठी काही काळ निश्चितच प्रतीक्षा करावी लागेल. पण महेश मांजरेकर दिग्दर्शित एकाचवेळी मराठी, हिंदीसह ५ भाषांमध्ये निर्मिती होत असलेल्या बिग बजेट ऐतिहासिक चित्रपट ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मध्ये माधुरी दिसणार हे नक्की! यामूळे माधुरीचे चाहते तिच्या ऐतिहासिक लुकच्या प्रतीक्षेत आहेत.

Tags: Instagram PostMadhuri PawarMahesh ManjrekarVedat Marathe Veer Daudle SaatViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group