Take a fresh look at your lifestyle.

माधुरी म्हणतेय.. ओ राया.. साडीसंगे आणा लाल मोठी गाडी; पहा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या मोहक अदा आणि ठसकेबाज नृत्यामुळे नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री आणि नृत्यांगना माधुरी पवार अलीकडे या बया दाजी आलं म्हणत होती. यानंतर आता आणा मला जरतारी साडी, साडीसंगे आणा लाल मोठी गाडी’ असे बोलताना दिसतेय. सप्तसूर म्युझिकच्या ‘लाल मोठी गाडी’ ह्या नव्या म्युझिक व्हिडिओतून माधुरीने पुन्हा एकदा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलय. तिचा हा व्हिडीओ नुकताच सप्तसूर म्युझिकच्या युट्युब चॅनेलवर रिलीज झाला आहे आणि तिच्या चाहत्यांनी डोक्यावरही घेतला आहे.

सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष यांनी ‘लाल मोठी गाडी ‘ या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. तर या गाण्याचे लेखन माधवी देवळणकर यांनी केले आहे. शिवाय अमेय मुळे यांनी संगीत दिलाय तर लरिसा अल्मेडा या नव्या गायिकेने हि लावणी गायली आहे. माधुरीने केलेल्या नृत्याचे दिग्दर्शन संतोष भांगरे यांनी केले आहे. तर अंकित शिंदे आणि दिव्या घाग ह्यांनी कार्यकारी निर्माते म्हणून काम पाहिले आहे. एका नव्या ढंगातली आणि हटके शब्दाची हि लावणी आहे. याची उडती चाल गाण्याला आणखी आकर्षक बनवतेय.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री माधुरी पवार चांगलीच चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे तिची अनोख्या कथानकाची आणि अनोख्या भूमिकेची ‘रानबाजार’ हि वेबसीरिज अलीकडेच रिलीज झाली आहे. यामध्ये माधुरीने राजकारणातील एका महत्वाकांशी आणि करारी स्त्रीची भूमिका अत्यंत उत्तम रित्या साकारली आहे. मुख्य म्हणजे ग्लॅमरच्या दुनियेत माधुरीने चक्क टक्कल करून हि भूमिका साकारली आहे. यामुळे तीच सर्व स्तरावर विशेष कौतुक होताना दिसत आहे. माधुरी मुळातच एक उत्तम अभिनेत्री आणि सर्वोत्तम नृत्यांगना आहे. यामुळे ती नेहमीच चाहत्यांच्या मर्जीत राहिली आहे.