Take a fresh look at your lifestyle.

ED’ची पीडा लागेल, त्यापेक्षा नकोच; ‘महामिनिस्टर’च्या 11 लाखांच्या पैठणीला नेटकऱ्यांकडून ‘ना’चा पाढा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संसारातून वेळ काढुनी खेळ खेळूया नवा म्हणत दारोदारी महाराष्ट्रातील तमाम वहिनींसाठी पैठणीचा मान घेऊन जाणारे आदेश भावोजी आज सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. होम मिनिस्टर हा कार्यक्रम गेली १८ वर्षे सुरु आहे. अलीकडेच होम मिनिस्टरचे महामिनिस्टर हे नवीन पर्व ११ एप्रिल पासून प्रक्षेपित होणार असल्याचे घोषित करण्यात आले. यामध्ये भाऊजी विजेत्या वहिनीला चक्क ११ लाख रुपयांची पैठणी देणार आहेत. ही पैठणी कशी आहे याचा प्रोमो रिलीज झाला आणि सोशल मीडियावर ट्रोलिंगला सुरुवात झाली आहे.

हा प्रोमो व्हिडीओ झी मराठी वाहिनीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये महामिनिस्टरची ११ लाखांची पैठणी नक्की आहे तरी कशी हे दाखवण्यात आले. तर ही पैठणी साडी हिरेजडीत असून त्याला खऱ्या सोन्याची जरी आहे. हा नवा प्रोमो अगदी झळाळणारा असणारा तरीही त्याचा लखलखाट नेटकऱ्यां काही भावलेला नाही. कारण या नव्या प्रोमोवरून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ११ लाखांच्या पैठणीवरून भावोजींसह झी मराठी वाहिनीचा देखील चांगलाच समाचार घेतला आहे.

एका नेटकाऱ्याने यावर म्हटले कि, ११ लाखांची पैठणी नेसून कोणाला मिरवायचं आहे? त्यापेक्षा जिथे गरज आहे तिथे ते पैसे वापरा. लोकांना सध्या पैशांची गरज आहे. अनेक गावांत पिण्यासाठी पाणीसुद्धा नाही. उन्हाळ्यामुळे लोकांचे हाल होतायत. तुम्ही त्यांची मदत करा. तसेच अन्य एका युजरने ११ लाखांच्या एका पैठणीऐवजी ११ लाख गरीब महिलांना साध्या साड्या वाटा, असा सल्ला दिला. याशिवाय एका नेटकऱ्याने तर याच पैठणीबाबत चिंता व्यक्त केली आहे. ‘बापरे.. कोणी चोरली तर? किंवा एखाद्याने रस्त्यावर चालताना हल्ला केला तर. अशा प्रकारे सोशल मीडियावर विविध पद्धतीने पैठणीबाबत प्रश्नांवर प्रश्न आणि ट्रोलिंग वर ट्रोलिंग केली जात आहे.