Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा वर आक्षेपार्ह टिप्पणी ; औरंगाबाद मधील तरुणाला अटक

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणापासून बॉलिवूड अनेक कलाकारांना घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन ट्रोल केलं जात आहे.आत्तापर्यंत करण जोहर , आलीया भट्ट, याना ट्रॉलिंग ला सामोरं जावं लागलं होतं अशातच आता अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी औरंगाबादमधून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. मुंबई सायबर पोलिसांकडे सोनाक्षी सिन्हानं तक्रार दिल्यानंतर ही कारवाई केली गेली.

काही दिवसांपासून बॉलिवूडमधील घराणेशाहीवरून वाद उभाळला होता. त्यातच काही कलाकारांना ट्रोल केलं जात आहे. यात सोनाक्षी सिन्हाचाही समावेश होता. त्यामुळे सोनाक्षीनं इन्स्टाग्रामवरील कमेंट सेक्शनही बंद करून टाकलं होतं. काही दिवसांपूर्वी तिने हे सेक्शन पुन्हा सुरू केलं. हे करताना आक्षेपार्ह शब्द वापरू नये, असं आवाहनही केलं होतं.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने महिला सुरक्षेबाबत ‘अब बस प्रॉम्प्ट अॅक्शन अगेन्स्ट हॅरॅसर्स’ या हॅशटॅगनं एक फोटो शेअर केला होता. मात्र, यावरून औरंगाबाद येथील शशिकांत जाधव या तरुणानं वादग्रस्त टिप्पणी केली. या तरुणानं टिप्पणी करताना इतर कलाकारांबाबतही आक्षेपार्ह भाषा वापरली.

या प्रकरणी सोनाक्षी सिन्हाने ८ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेनं याची गंभीर दखल घेत प्रकरणी कारवाई केली. तरुणाविरुद्ध विनयभंग व माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधात्मक कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

चौकशीमध्ये टिप्पणी करणारा तरुण औरंगाबाद येथील असल्याचं समोर आलं. त्यानंतर सायबर गुन्हे शाखा पोलिसांनी शशिकांत जाधव याला अटक केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’