Take a fresh look at your lifestyle.

धोनीची विंडिज दौऱ्यातून माघार; पुढचे २ महिने लष्करात

0

नवी दिल्ली | महेंद्रसिंह धोनी निवृत्ती घेणार का? असा प्रश्न वर्ल्डकप २०१९ संपल्यानंतर अनेक स्तरातून विचारला जात आहे. त्यातच ३ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या विंडिज दौऱ्यासाठी रविवारी निवड समिती संघाची घोषणा करणार आहे. ही घोषणा होण्यापूर्वीच धोनीने आपण विंडीज दौऱ्यावर जाण्यासाठी इच्छूक नसल्याचे बीसीसीआयला कळवले आहे. पुढचे दोन महिने धोनी लष्करात काम करणार आहे. पुढच्या दोन महिन्यांसाठी धोनी लष्कराच्या पॅरा रेजिमेंटसाठी काम करणार आहे.

धोनीकडे प्रादेशिक लष्कराचे पॅराशूट रेजिमेंटचे मानद लेफ्टनंट कर्नलपद आहे. दोन महिने सेवा देण्याचा निर्णय वर्ल्डकपच्या आधीच झाला असल्याचे आता सांगण्यात येत आहे. एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील समिती रविवारी विंडीज दौऱ्यासाठी संघ निश्चित करणार आहे, त्यापूर्वीच धोनीने आपली माघार जाहीर केली आहे.

धोनीने विडींज दौऱ्यातून माघार घेतल्यामुळे तो निवृत्ती घेण्याच्या विचारात आहे का? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र त्यावर एमएसके प्रसाद यांनीच स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, “सध्यातरी धोनी निवृत्ती घेणार नाही. त्याने प्रादेशिक लष्कर विभागाला शब्द दिला होता, त्याप्रमाणे तो दोन महिने पॅरामिलिटरी रेजिमेंटला सेवा देणार आहे. त्याचा हा निर्णय कर्णधार विराट कोहली आणि बीसीसीआयचे अध्यक्षांना कळविण्यात आला आहे. तसेच निवड समितीला कुणालाही क्रिकेट कधी सोडणार हे सांगण्याचा अधिकार नाही. संघात खेळाडूंची निवड करणे एवढेच निवड समितीचे काम आहे.”, असेही प्रसाद यांनी स्पष्ट केले.

३ ऑगस्ट पासून भारतीय संघ विडींज दौऱ्यावर जात आहे. या दौऱ्यात ३ टी-२० मॅच, तीन वन डे आणि दोन टेस्ट मॅच खेळणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: