Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘मुस्लिमांच्या मांडीला मांडी लावून..’; धर्माचे राजकारण करणाऱ्यांचा टिळेकरांनी घेतला तिखट समाचार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 17, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Mahesh Tilekar
0
SHARES
161
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी दिग्दर्शक आणि निर्माते महेश टिळेकर हे सोशल मीडियावर नुसते सक्रिय नसतात. तर समाजातील विविध विषयांवर ते उघड आणि परखड भाष्य करतानाही दिसतात. ज्यामुळे अनेकदा ते ट्रोल होतात पण मुद्दा सोडत नाहीत. अलीकडेच टिळेकरांनी शरद पोंक्षे आणि स्वप्नील जोशीला दिलेल्या ‘हिंदुत्व के आधारस्तंभ’ पुरस्कारावर आक्षेप घेणारी पोस्ट शेअर केली होती आणि नंतर डिलीट केली. ज्यामुळे ते चर्चेत राहिले. यातच आता त्यांनी पुन्हा एकदा थेट हिंदुत्वावर भाष्य करीत धर्मावर राजकारण करणाऱ्यांचा चांगलाच झणझणीत समाचार घेतला आहे.

सध्या हिंदुत्वाचा मुद्दा फार मोठा झाला आहे. आमीरचा ‘लालसिंग’ आणि आता शाहरुखचा ‘पठाण’ यांचा वास्तविक शर्माशी संबंध नसताना तो जोडून केले जाणारे राजकारण यावर टिळेकर व्यक्त झाले आहेत. त्यांनी म्हटलं आहे कि, ‘हिंदुत्व आणि हिंदुत्वासाठी दिलेल्या योगदानाबद्दल स्वप्नील जोशी, शरद पोंक्षे यांना देण्यात आलेल्या पुरस्काराबद्दल मी दोन एक दिवसांपूर्वी पोस्ट लिहिली होती. त्याच पोस्ट मध्ये मी हिंदूंच्या वैष्णोदेवी मंदिरात जाऊन नतमस्तक होणारा शाहरुख खान आणि स्वतः च्या ऑफिस मध्ये हिंदू पद्धतीने पूजा विधी करणारा आमिर खान यांनी स्वतः मुस्लिम धर्मीय असूनही हिंदू धर्माचा आदर केल्याबद्दल कोणती संघटना यांना पुरस्कार देईल का ? असा प्रश्न केला होता. ही पोस्ट नंतर मी डिलीट केली, त्याला कारण म्हणजे काहींनी जातीवरून कमेंट्स करणाऱ्या एकमेकांचा उद्धार सुरू केला होता, एकतर मी स्वतः जात मानत नाही म्हणून आणि एका विद्वानाने कमेंट्स मधून शाहू फुले आंबेडकर यांचा चुकीच्या पद्धतीने उल्लेख केला जो मला आवडला नाही.’

‘शाहरुख खान, आमिर खान यांच्या बाजूने वक्तव्य केल्यामुळे कंत्राटी पद्धतीने कमेंट्स मधून ट्रोल करण्याचे काम करणाऱ्या बेरोजगारांनी मला हिंदुत्व म्हणजे काय हे माहीत नसल्याचा आरोप केला. काहींनी दीपिका पदुकोणने घातलेल्या भगव्या ड्रेस वरून हिंदूंचा झालेला अपमान तुम्हाला चालतो का असा प्रश्न केला. दोन दिवसांपू्वी प्रसिद्ध अभिनेता रजनीकांतने हिंदू असूनही संगीतकार रेहमान याच्या बरोबर एका दर्ग्यावर जाऊन दर्शन घेतले, त्यावेळी त्याच्या आणि रेहमानच्या खांद्यावर भगव्या रंगाचे उपरणे, डोक्यावर भगव्या रंगाचे मुंडासे दिसत आहे. आता या दोघांना पण हिंदूंचा अपमान केला म्हणून कुणी नावं ठेवली तर चुकीचं नाही का???’

1) मुस्लिम असूनही फुटपाथवरील छोट्या हिंदू मुलीला घरात आणून तिला मुलगी मानून तिला वाढवणारे सलमानचे वडील सलीम खान,

2) नातेवाईकांचा विरोधाला बळी न पडता, स्वतः ची श्रद्धा आहे म्हणून गणेशोत्सवात घरी गणपतीची प्रतिष्ठापना करून दहा दिवस गणपतीची आरती, पूजा करणारी पुण्यातील मुस्लिम महिला,

3) मराठी रंगभूमीवर आपल्या आवाजाने, अभिनयाने ठसा उमटविणाऱ्या आणि नाट्यसंगीतात मोलाचं योगदान देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री फय्याज शेख या पुण्यात आल्यावर दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला जातात, पुढे दत्तमंदिरात ही जातात. मी त्यांच्या मुंबईतील घरी एकदा गेलो होतो तेंव्हा हिंदू देवी देवतांचे फोटो, मूर्ती त्यांच्या घरात दिसल्या. नियमित त्या पोथ्या, स्वामी चरित्र वाचतात. एकदा मी त्यांच्या तोंडून पसायदान ऐकले आहे.

अश्या अनेकांनी स्वतः च्या धर्माची भिंत आड न येऊ देता हिंदू धर्माचा केलेला आदर माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली राजकारण करणारे नेते दहीहंडी सारख्या हिंदू उत्सवाच्या कार्यक्रमाला शाहरुख खानला बोलवतात, तेव्हा त्याच्या प्रसिध्दी, नावामुळे स्वतःचं उखळ पांढरं करून घेतात. ते चालतं त्यांना आणि त्यांच्या पक्षालाही. रमजानला मुस्लिमांच्या मांडीला मांडी लावून शिरखुरमा ओरपणारे आणि बिर्यानीवर उभा आडवा हात मारणारे नेते, त्यांना कुणी का सवाल करत नाहीत? थोडक्यात काय तर धर्माचं राजकारण आपापल्या सोयीप्रमाणे करणारे महाभाग समाजात आहेत. असो मी हिंदू आहेच पण माझ्या हिंदू धर्माबरोबरच इतर धर्माचाही मला आदर आहे आणि माझ्या धर्माचा आदर करणाऱ्या शाहरुख खान, आमिर खान, फय्याज अश्या सगळ्यांचा मला अभिमान आहे’.

Tags: Director Mahesh TilekarFacebook Postmarathi directorviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group