Take a fresh look at your lifestyle.

‘बॉलिवूडला मी परवडणार नाही.. मग माझा वेळ का वाया घालवू?’; महेश बाबूच्या वक्तव्याने इंडस्ट्रीत खळबळ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू याचा दाक्षिणात्य भाषिक जितका चाहतावर्ग आहे तितकाच हिंदी आणि अगदी मराठी भाषिक देखील चाहता वर्ग आहे. त्यामुळे महेश बाबूचा सिनेमा आला कि तो फक्त दक्षिणेतच नाही तर भारतात सर्वत्र प्रदर्शित होतो आणि हिटसुद्धा होतो. साउथ सिनेइंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये महेश बाबूचे नाव आहे. नुकताच तो आदिवी सेषच्या ‘मेजर’ या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला हजर राहिला होता. दरम्यान त्याने या सोहळ्यात माध्यमांशी संवाद साधताना असे काही वक्तव्य केले आहे कि काही विचारूच नका. त्याने बॉलिवूड इंडस्ट्रीविषयी व्यक्त केलेले मत ऐकून सगळेच चाट पडले.

या कार्यक्रमात माध्यमांकडून महेश बाबू याला बॉलिवूड सिनेसृष्टीतील पदार्पणाविषयी काही प्रश्न विचारण्यात आले. दरम्यान या प्रश्नांवर बोलताना त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याविषयी आपले रोखठोक मत मांडले. “हिंदी फिल्म इंडस्ट्रीला मी परवडणार नाही. त्यामुळे हिंदी चित्रपटांवर मी माझा वेळ का वाया घालवू”, असे तो यावेळी म्हणाला. त्याच हे वक्तव्य ऐकून बॉलिवूड इंडस्ट्री मात्र चांगलीच हादरली आहे. महेशला याआधीही अनेकदा बॉलिवूड पदार्पणाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र तेव्हासुद्धा त्याने हिंदीत काम करण्याची इच्छा अजिबात नाही असेच सांगितले होते.

या कार्यक्रमात महेश बाबूने ओटीटीवर पदार्पण करण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले कि, ओटीटीवर सुद्धा काम करण्याचा माझा विचार नाही. तो म्हणाला कि, “मला हिंदी चित्रपटांच्या ऑफर्स येतात, पण मला वाटत नाही की त्यांना मी परवडू शकेन. ज्या इंडस्ट्रीला मी परवडू शकत नाही. अशा ठिकाणी काम करून मी माझा वेळ वाया घालवू इच्छित नाही. मला इथे (दक्षिणेत) प्रचंड स्टारडम आणि आदर मिळतोय. त्यामुळे ही इंडस्ट्री सोडून दुसरीकडे काम करण्याचा मी विचारच करू शकत नाही. चित्रपटांमध्ये काम करून मोठा कलाकार बनायचं माझं स्वप्न होतं. हेच स्वप्न मी आता जगतोय आणि याहून अधिक खूश मी होऊ शकत नाही”.