Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

महेश टिळेकरांकडून पोंक्षे- जोशींविरोधातील ‘ती’ पोस्ट डिलीट; असं काय लिहिलं होतं..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 15, 2022
in सेलेब्रिटी, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ
Mahesh Tilekar
0
SHARES
15.4k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेते शरद पोंक्षे आणि चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी यांना अलीकडेच हिंदु धर्मासाठी दिलेल्या योगदानाबद्दल ‘हिंदुत्व के आधारस्तंभ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सन्मानासाठी कलाकारांनी सोशल मीडियावर आभार देखील व्यक्त केले आहेत. अशातच मराठी दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी आक्षेप घेत म्हटलंय कि, या कलाकारांनी हिंदुत्वासाठी असं काय केलं ज्यामुळे हा पुरस्कार देण्यात आला..? यासंबंधीत फेसबूक पोस्ट टिळेकरांनी केली होती. मात्र लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी ती डिलिटही केली. आता असे का केले..? हे त्यांनाच ठाऊक. (पोस्ट डिलीट केल्यामुळे इन्सर्ट करता आलेली नाही)

महेश टिळेकर यांनी पोस्टमध्ये लिहिलं होतं कि, ‘अभिनंदन पोंक्षे, जोशी. नुकत्याच एका संस्थेने जेष्ठ आणि विद्वान अभिनेते शरद पोंक्षे आणि बाल कलाकार ते हिरो असं प्रचंड यश मिळवणारा सुपरस्टार अभिनेता स्वप्नील जोशी यांना हिदुत्व आणि हिंदू धर्मासाठी दिलेल्या योगदानाबद्दल पुरस्कार देऊन गौरव केला. यामुळे या कलाकारांचा अभिमान वाटून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करून त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा इतकं कोणतं महान कार्य या कलाकारांनी हिंदुत्वासाठी केलं आहे जे या आधी कुठल्याच कलाकारांना जमलं नाही. कलाकाराला त्याच्या अभिनयासाठी किंवा त्याने समाजासाठी काहीतरी योगदान दिलं म्हणून त्याचा सन्मान, गौरव होतो हे आत्तापर्यंत पाहण्यात आलं होतं. पण कलाकाराला धर्मासाठी म्हणून पुरस्कार देण्यात येतोय हे मी पहिल्यांदाच पाहतोय.’

View this post on Instagram

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi)

‘आत्तापर्यंत मी अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकारांकडून कलाकाराला आणि कलेला धर्म नसतो हे त्यांचे विचार मांडताना पाहिलं आहे. पण आज पोंक्षे, जोशी यांना धर्मासाठी म्हणून देण्यात आलेल्या पुरस्कारामुळे त्यांनी हिंदुत्वासाठी किती आणि कशा पद्धतीनं भरीव काम केलं आहे हे आता जगासमोर आलं तर त्यांच्यामुळे अनेकांना दिशा, प्रेरणा मिळेल. आपणही काय केलं पाहिजे हे पोंक्षेसारख्या थोर विचारवंत कलाकाराकडून आजच्या पिढीला शिकता येईल.

View this post on Instagram

A post shared by Sharad Ponkshe (@sharadponkshe)

पण हिंदू नसूनही लोक, समाज काय म्हणेल याची पर्वा न करता हिंदू पद्धतीने स्वतःच्या नवीन ऑफिसमध्ये पूजाविधी करणारा आमिर खान असो किंवा वैष्णोदेवीसारख्या हिंदू मंदिरात जाऊन नतमस्तक होणारा शाहरुख खान असो, या कलाकारांनी स्वतःच्या प्रोडक्शन हाउसमध्ये अनेक हिंदूंना जॉब देऊन नव्या कलाकारांना संधी दिली आहे. या कलाकारांना कोणती हिंदू संस्था पुरस्कार देईल का?’ या पोस्टवर अनेकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या होत्या. काहींनी टीका तर काहींनी दुजोरा दिला होता. मात्र त्यांनी ही पोस्ट डिलिट केली आहे. आता का केली..? कशाला केली..? डिलीट करायची होती, तर आधी पोस्ट कशाला केली..? जाब विचारणे हे नाटक होते का..? असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडले तर यात काही वावगे ठरणार नाही.

Tags: Facebook PostInstagram Postmahesh tilekarsharad ponksheswapnil joshi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group