Take a fresh look at your lifestyle.

…तेव्हाच हा नट माझ्या मनातून पहिल्यांदा उतरला !!  दिग्दर्शक महेश टिळेकरांचा अनुपम खेर यांच्यावर निशाणा

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशात शेतकरी आंदोलन जोरदार सुरू असून शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटिनी भाष्य केल्यानंतर भारतीय कलाकारांनी त्यांना उत्तर देत सरकारचे समर्थन केले. यावरुन आता अभिनेते अनुपम खेर आणि मराठी दिग्दर्शक महेश टिळेकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली आहे.

विदेशी सेलिब्रिटींना भारताच्या अंतर्गत प्रश्नी लक्ष न घालण्याचा सल्ला अनुपम यांनी दिला. पण त्यांच्या या सल्ल्याने निर्माता-दिग्दर्शक महेश टिळेकर चांगलेच खवळले.

महेश टिळेकर यांनी फेसबुक पोस्ट द्वारे अनुपम खेर यांच्यावर निशाणा साधला आहे.दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या भेटीनंतर अनुपम खेर मनातून पहिल्यांदा उतरले होते. त्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा द्यायला स्टेजवर जाऊन भाषण ठोकताना पाहून अनुपम खेर हा किती मोठा ‘कल्लाकार’ आहे ते समजलं. तिथे जमलेला अफाट जनसमुदाय,प्रेस मीडिया यांच्या समोर स्वत: ची लाल करून अण्णा हजारे बद्दल कळवळा दाखवणारा हा संवेदनशील कलाकार, दिल्लीत शेतक-यांना पाठिंबा द्यायला किंवा साधं भेटायला जाण्याचं धाडस का दाखवत नाही? असा थेट सवाल त्यांनी केला आहे.

सिनेसृष्टीतील मुखवट्यामागचे खरे चेहरे आणि खायचे-दाखवायचे दात वेगळे असणाऱ्या कलाकारांची संख्या कमी नाही. संधीसाधू असणारे आणि लोकांच्या प्रेमामुळे मोठ्या झालेल्या काही कलाकारांचे खरे रुप वेळोवेळी माझ्या पाहण्यात आले आहे. लोकांचं प्रेम मिळून लोकप्रिय यशस्वी झालेल्या या काही कलाकारांची अवस्था आपल्या राष्ट्रीय पक्षी मोरासारखी असते. मोराला आपल्या पिसाऱ्यावर गर्व असतो, तो पिसारा फुलवून दाखवला की पाहणाऱ्यांकडून कौतुक होते, वाहवा मिळते, म्हणून मोर खुश असतो. पण पिसारा फुलवणाऱ्या मोराचा पार्श्वभाग (मागचा भाग) हा मात्र उघडा असतो हे सत्य आहे. काहीशी अशी अवस्था अनुपम खेर या नटाची आहे असं मला वाटतं. अर्थात अभिनेता म्हणून तो ग्रेटच आहे” असं महेश टिळेकरांनी लिहिलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave A Reply

Your email address will not be published.