Take a fresh look at your lifestyle.

लवकरच येणार एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

हॅलो बॉलिवूड ऑनलाइन । छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाणारी मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका आहे. या मालिकेत संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा अभिनेता डॉ.अमोल कोल्हे यांनी साकारली आहे. खूपच कमी कालावधीत लोकप्रिय झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं एक वेगळा स्थान मिळवलं आहे. मात्र ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

एखादी मालिका संपायला लागली की तिची जागी नवीन मालिका येते. त्यामुळे ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका संपल्यानंतर त्या जागी एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत दोन नवे चेहरे आपल्याला दिसणार आहे.

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका संपल्यानंतर त्या जागी ‘माझा होशील ना’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कौटुंबिक कथानकावर आधारित ही मालिका आहे. या मालिकेमध्ये गौतमी देशपांडे आणि विराजस कुलकर्णी हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची बहीण असून विराजस हा अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे.या मालिकेत त्यांच्यासोबत सुनील तावडे, विनय येडेकर, निखिल रत्नपारखी, अच्युत पोतदार, विद्याधर जोशी अशी दिग्गज कलाकारमंडळी स्क्रीन शेअर करणार आहे. ही मालिका येत्या २ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Comments are closed.

%d bloggers like this: