हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड जगतातील अत्यंत चर्चेत असलेले कपलं म्हणजेच हॉट, बोल्ड मलायका अरोरा आणि हँडसम हंक अर्जुन कपूर. गेल्या बराच काळापासून हे दोघेही एकमेकांना डेट करत आहेत आणि अनेकदा ते पँराझींना एकत्र पोझ करताना दिसतात. यामुळे त्यांचं चर्चेत असणं फारच साहजिक आहे. दरम्यान काही दिवसांपासून ते लवकरच लग्न करणार आहेत अशी चर्चा जोरदार सुरू आहे. त्यामुळे अर्जुन आणि मलायकाच्या जोडीचे चाहते चांगलेच खुश झाले आहेत. याबाबत अभिनेत्री मलायका अरोरा हिने स्वतःच संकेत दिल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्र आणि एका वृत्त वाहिनीने याबाबतची सविस्तर माहिती दिलेली आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मलायकाने सांगितलं की, ‘आम्ही एकमेकांना गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतो. आमच्या चाहत्यांना आम्ही लग्न करावं असं वाटणं साहजिकच आहे. त्याची चर्चा आहे. आम्ही सध्या अशा जागी आहोत जिथे यापुढील काळात काय करायला हवे याचा विचार व्हायला पाहिजे. त्यामुळे लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे नियोजनही सुरु केले आहे. येत्या काळात त्याविषयीची अधिक माहिती तुमच्यापर्यत येईलच. एकमेकांची चांगली ओळख झाली आहे. आमचे विचारही सारखेच आहेत. त्यामुळे आता वेगळं नातं निर्माण करावं असं वाटू लागलं आहे असेही मलायकानं म्हटलं आहे.
तर वृत्त वाहिनी इ टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अर्जुन कपूरसोबतच्या भविष्यातील आणि लग्नाच्या योजनांबद्दल बोलताना मलायका अरोरा एका मुलाखतीत म्हणाली आहे कि, “प्रत्येक नात्याची एक प्रोसेस असते, प्रत्येकाचे काही ना काही प्लॅन्स असतात आणि पुढे काय आणि कोठे जायचे हे ज्याने त्याने ठरवलेले असते. आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे दोघांनाही भविष्यात एकत्र राहायचे आहे हे माहित असणे. त्यामुळे जर तुम्ही अशा रिलेशनशिपमध्ये असाल जिथे तुम्ही अजूनही काही गोष्टी शोधत आहेत आणि म्हणत असाल, ‘अरे, मला माहित नाही’… मी माझ्या नात्यात तशी नाही. ते माझ्यासाठी पवित्र आणि महत्त्वाचे आहे. मला असे वाटते की आपण अशा ठिकाणी आहोत जिथे आपण काय, कुठे आणि पुढील भागांचा विचार करत आहोत.”
त्यामुळे आता मलायकाने स्वतःच माध्यमांसोबत बोलताना केलेल्या वक्तव्यांवरून तरी असेच वाटत आहे कि लवकरच त्यांच्या घरात लगीनघाई पहायला मिळेल. सध्या मलायका आणि अर्जुन हे लिव्ह इन मध्ये राहत आहेत. तूर्तास मलायकाने मीडियासमोर बऱ्याच गोष्टींची उकल केली असली तरीही अर्जुन मात्र मौन आहे. यावर अजूनही अर्जुन कपूरचे स्वतःहून कोणताही दुजोरा दिलेला नाही. अलीकडेच रणबीर- आलिया, विकी – कतरिना यांच्या लग्नाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. यानंतर आता मलायका आणि अर्जुन विवाह बेडीत अडकणार हि चर्चा सुरु झाल्यापासून सगळेच त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.