Take a fresh look at your lifestyle.

मलायका इन पिंक! मिनी स्कर्टमध्ये अभिनेत्रीच्या वयाचाही पडला विसर; पहा फोटो

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा हि सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. वयाच्या चाळिशीनंतरही ती आपल्या मादक अदांमुळे अत्यंत आकर्षक आणि सुंदर दिसते. आपल्या हॉटनेसमुळे ती सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये असते. अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशीपमुळे ती जेव्हढी चर्चेत असते ना त्यापेक्षा जास्त तिच्या व्हायरल होणाऱ्या फोटोशूटमुळे असते. नियमित वर्कआउटमूळे मलायकाने आपली फिगर मेंटेन केली आहे. इतकेच काय तर तिचे किंचितही वय तिच्या चेहऱ्यावर दिसत नाही असं फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिने गुलाबी रंगाचा क्युट मिनी ड्रेस परिधान केला आहे आणि ती यात फारच सुंदर दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिने आपल्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर हे फोटोग्राफ शेअर केले आहे. मलायकाने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिने शॉर्ट मिनी स्कर्ट आणि क्रॉप टॉप परिधान केला आहे. मुख्य म्हणजे तिचा हा लूक अतिशय परफेक्ट दिसत आहे. इंडस्ट्रीतील फिट आणि परफेक्ट फिगर असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये मलायका अरोराचं नाव येत. सध्या तिचं व्हायरल होणारं हे फोटोशूट कमालीचं आहे. यामध्ये तिने गुलाबी रंगाचा मिनी स्कर्ट ड्रेस परिधान केला आहे. या गुलाबी रंगाचे सौंदर्य मलायकाच्या सौंदर्यात भर घालत आहे.

मलायका अरोरा आपल्या सोशल मीडिया हँडलवर नेहमीच सक्रिय असते. त्यामुळे अनेकदा ती असे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या तिचा नवीन लूक सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. मलायका अरोराने परिधान केलेलं शर्ट स्टाईलमध्ये क्रॉप टॉप हा एक हटके आहे. ज्यामुळे तिचा लूक आणखी ग्लॅमरस वाटतो आहे. या फोटोमध्ये मलायका एका हॉटेलच्या लॉबीमध्ये उभी असल्याचे दिसतेय. शिवाय ती कॅमेराला एकाहून एक जबरदस्त पोझ देत आहे.