Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

पन्नाशी आली पण मलायका काय ऐकत नाय; इंस्टावर शेअर केला सबसे कातिल अंदाज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 17, 2023
in Trending, गरम मसाला, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Malaika Arora
0
SHARES
333
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडची बोल्ड, हॉट, ग्लॅमरस आणि कमालीची फिट अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच आपल्या कातिलाना अंदाजामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. चाळीशी गेली आता पन्नाशी आली आणि तरीही मलायका इतर अभिनेत्रींना मागे टाकेल इतकी कमालीची क्लास दिसते. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या कहर अंदाजाचे चाहते आजही मोठ्या संख्येत आहेत. नुकत्याच झालेल्या ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने अर्जुन कपूरने त्याचा आणि मलायकाचा एक फोटो इंस्टावर शेअर केला होता. जो त्यांच्या रिलेशनशिप इतकाच चर्चेत राहिला. यानंतर आता मलायकाने शेअर केलेला ग्लॅमरस तडका सोशल मीडियाच वातावरण तापवतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

गेली अनेक वर्ष बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा एकमेकांसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. याशिवाय हे दोघे खुलेआम आपले प्रेम व्यक्त करताना दिसतात. हि कजोडी बॉलिवूडमधील ट्रेंडिंग जोड्यांपैकी एक आहे. अनेक कार्यक्रम, इव्हेन्ट आणि पार्टी हे कपल एकत्र एन्जॉय करताना दिसते. त्यामुळे सोशल मीडियावर हे दोघेही नेहमीच चर्चेत असतात. पण याहून अधिक चर्चा पन्नाशीतल्या मालयकाच्या फिटनेसची होती. मलायका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्यामुळे ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याची एकही संधी सोडत नाही. विविध फोटो, व्हिडीओ मलायका सोशल मीडियावर शेअर करत असते. असाच एक व्हिडीओ शेअर करून तिने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

View this post on Instagram

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

मलायकाने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती अगदीच ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे. या व्हिडिओत ती कॅमेऱ्यासमोर स्वतःचे केस विस्कटत अतिशय दिलखेचक पद्धतीने हसताना दिसत आहे. बाणेदार घायाळ नजरेने ती स्वतःलाच न्याहाळत आहे. तिच्या अदा अतिशय जीवघेण्या आहेत. अत्यंत मादक स्वरूपातील तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मलायकाने हा व्हिडीओ शेअर करताना त्यासोबत ‘Tropic like it’s hot!’ असे कॅप्शन दिले आहे.

Tags: Bollywood ActressInstagram PostMalaika AroraViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group