Take a fresh look at your lifestyle.

अर्जुनला रॅम्पवर पाहून मलायकाच्या गाली चढली लाली; पहा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। वयात किती अंतर आहे यापेक्षा किती प्रेम आहे हे दाखवणारे बॉलिवूडचे ट्रेंडिंग कपल अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. तसं ट्रोल होण्यात त्यांचा नंबर पहिला असला तरीही ट्रोलिंगची चिंता करणाऱ्यांमध्ये ते नक्कीच नाहीत. सोशल मीडिया नेहमीच त्यांना ट्रोल करण्यासाठी संधी शोधत असतो. तर अर्जुन आणि मलायका एकमेकांवर किती प्रेम करतात हे दाखवण्यासाठी नेहमीच आतुर असतात. नुकताच एका रॅम्प शो मध्ये अर्जुन कपूर रॅम्पवर चालताना दिसला आणि त्याला पाहून मलायका चक्क ब्लश करताना दिसली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

हा एक फॅशन शो असून यामध्ये अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा दोघेही रॅम्पवर झळकले. दरम्यान अर्जुन जेव्हा रॅम्पवॉल्क करत आला तेव्हा मलायकाने आपला फोन बाहेर करून त्याचं शूट घेण्यास सुरुवात केली. दरम्यान ती चक्क लाजतानाही दिसली. शिवाय अर्जुनही तिला पाहून चालत आला आणि तिच्या जवळ जाऊन काही बोलला. यानंतर तिच्या चेहऱ्यावर आणखीच रंग खुलला. लाजेने ती अगदी लालम लाल झाली होती आणि तिच्या मैत्रिणी तिला छेडतानाही दिसल्या. अनेकदा या नात्यामुळे अर्जुन मलायका ट्रोल झाले पण त्यांनी एकमेकांची साथ सोडली नाही हेच काय ते महत्वाचं. यावेळी तर सोशल मीडियावरही त्यांच्या ट्रोलिंगपेक्षा प्रेमाची चर्चा जास्त होताना दिसत आहे.\

‘इंडिया टीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, यंदा नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात अर्जुन आणि मलायका लग्न करणार आहेत असं समजतंय. मुख्य म्हणजे मुंबईतच आणि अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत ते लग्न करणार आहेत अशीही माहिती दिली जातेय. त्यानंतर मित्र परिवारासाठी ते एका भव्य रिसेप्शनचे आयोजन करणार आहेत असेही या वृत्तात म्हटले आहे. अगदी पहिल्यापासूनच अर्जुन आणि मलायकाचं नातं चर्चेत राहिलं आहे. कारण अर्जुन आणि मलायका दोघांच्या वयातील अंतर तब्बल १२ वर्षांचे आहे. मलायका ४८ वर्षांची असून अर्जुन हा ३६ वर्षांचा आहे.